धुळे जिल्ह्यात ५३८ जणांकडे शस्त्राचा परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:14 AM2018-02-19T11:14:16+5:302018-02-19T11:14:51+5:30
जिल्हा प्रशासन : नुुतनीकरणासाठी आता अंतिम मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : स्वत:च्या सुरक्षिततेसाठी शस्त्र बाळगण्याचा नवा फंडा आता उदयास येत आहे़ जिल्ह्यात सद्यस्थितीत ५३८ जणांकडे शस्त्राचा परवाना आहे़ त्यातील काही जणांचे नुतनीकरण बाकी असल्याने त्यांचा ३१ मार्चची अंतिम मुदत देण्यात आली आहे़
केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार शस्त्र नियम २०१६ लागू करण्यात आले आहेत़ शस्त्र नियम २०१६ मधील नियम ११ नुसार प्रत्येक नवीन शस्त्र परवाना धारकांना युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक अर्थात यूआयएन प्राप्त करुन घेण्याकरीता नॅशनल डाटाबेस आर्म्स लायसन्स या आॅनलाईन संगणक प्रणालीवर माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे़
किंबहुना, या प्रणालीवर ज्या शस्त्र परवाना धारकांची नोंद राहिल तेच परवाने विधीग्राह्य राहतील़ नोंद नसणाºया शस्त्रांचे परवाने रद्द ठरविण्यात येतील़ या प्रणालीनुसार युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक प्राप्त असलेल्या शस्त्र परवानाधारकांचेच परवाने नुतनीकरण, शस्त्रांची खरेदी-विक्री, पत्ता बदल आणि अन्य अनुषंगिक बाबींचे काम आर्म लायसन्स इन्शुरन्स सिस्टिम प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे़
जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत ३१ मार्च २०१८ पुर्वी आवश्यक त्या माहितीसह तात्काळ संपर्क साधावा़ दिलेल्या मुदतीत जे शस्त्र परवानाधारक आॅनलाईनबाबतची माहिती सादर करणार नाहीत, अशा शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द ठरविण्यात येतील़