गावठी पिस्तुलासह एक ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 05:08 PM2017-08-02T17:08:34+5:302017-08-02T17:14:50+5:30

एलसीबीची कारवाई : ३ जीवंत काडतुसेंसह घातक शस्त्र आढळली

arrested one persone with gun | गावठी पिस्तुलासह एक ताब्यात!

गावठी पिस्तुलासह एक ताब्यात!

googlenewsNext
ठळक मुद्देही कारवाई पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड, पत्याच्या घराची झाडाझडती घेतली असता गावठी पिस्तुल आणि ३ जीवंत काडतुसे याशिवाय लोखंडी रॉड, बेसबॉलचा दांडा असे घातक स्वरुपातील शस्त्र जप्त करण्यात आले आहे़ जप्त केलेल्या ऐवजाची किंमत सुमारे ६५ हजार ६०० रुपये इतकी आहे़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पवनस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास वडजाई रोडवरील चंद्रमणी चौकातील एका घरावर छापा टाकून पवन दिलीप वाघ (२९) या तरुणाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आ


धुळे : शहरातील वडजाई रोडवर असलेल्या चंद्रमणी चौकातून एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयावरुन ताब्यात घेतले़ त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह ३ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली़ याशिवाय त्याच्याकडे घातक शस्त्रही आढळून आल्याने त्याला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ ही कारवाई बुधवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली़ 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास वडजाई रोडवरील चंद्रमणी चौकातील एका घरावर छापा टाकून पवन दिलीप वाघ (२९) या तरुणाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता गावठी पिस्तुल आणि ३ जीवंत काडतुसे याशिवाय लोखंडी रॉड, बेसबॉलचा दांडा असे घातक स्वरुपातील शस्त्र जप्त करण्यात आले आहे़ जप्त केलेल्या ऐवजाची किंमत सुमारे ६५ हजार ६०० रुपये इतकी आहे़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पवन वाघ याच्या विरोधात शस्त्र अधिनियम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड, पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण, पोलीस उपनिरीक्षक दिलीप माळी, हेकॉ जितेंद्र आखाडे, संदीप थोरात, पोलीस नाईक आरीफ शेख, नितीन मोहने, पोकॉ गौतम सपकाळे, विजय मदने, मयूर सोनवणे, चेतन कंखरे, मनोज बागूल, महिला पोलीस कविता देशमुख, कल्याणी पाटील यांनी ही कारवाई केली़ 

Web Title: arrested one persone with gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.