पिस्तूल विक्रीसाठी येताच दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:48 PM2019-12-24T22:48:18+5:302019-12-24T22:48:37+5:30

पारोळा चौफुली : सापळा लावून केली अटक

Arriving at the sale of the pistol, the two arrested | पिस्तूल विक्रीसाठी येताच दोघे जेरबंद

पिस्तूल विक्रीसाठी येताच दोघे जेरबंद

Next

धुळे : पारोळा चौफुलीवर दोन जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला़ यात दोघांना जेरबंद केले़ ही कारवाई सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ त्यांच्याकडील दुचाकीही जप्त केली आहे़
शहरातील पारोळा चौफुलीवर दोन जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती़ माहिती मिळताच सापळा लावण्यात आला़ मिळालेल्या माहितीनुसार एमएच १५ एक्यू २६३६ क्रमांकाच्या दुचाकीवरुन दोन जण आले़ त्यांना थांबवून चौकशी करण्यात आली़ त्यांची अंगझडतीही घेण्यात आली असता त्यांच्याकडे २१ हजार रुपये किंमतीची सिल्वर रंगाची गावठी बनावटीची लोखंडी धातूची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस मिळाले़ याशिवाय २५ हजार रुपये किंमतीची दुचाकीही हस्तगत करण्यात आलेली आहे़
याप्रकरणी भिलू भिवराज साळवे (२८, रा़ गुरुकुल हायस्कूलच्या पाठीमागे, साक्री रोड, धुळे) आणि महेश राजेंद्र शिंदे (२०, रा़ सिंचन भवनाच्या पाठीमागे, साक्री रोड, धुळे) या दोघां संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ त्यांना न्यायालयात हजर केले असता २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ पोलीस तपास करीत आहे़
पोलिसांनी पकडलेला भिलू साळवे हा व्यवसायाने पेंटर आहे़ तर महेश शिंदे हा सफाई कामगार आहे़ त्यांच्याकडे पिस्तूल आली कशी, ती कोणाला विकणार होते, याची चौकशी पोलीस करीत आहेत़

Web Title: Arriving at the sale of the pistol, the two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.