धुळे आगारात कर्मचाºयांचे अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:47 PM2017-10-19T12:47:12+5:302017-10-19T12:49:41+5:30
संपाचा तिसरा दिवस : प्रवाशांचे हाल सुरूच
आॅनलाईन लोकमत
धुळे : एसटी महामंडळातील कर्मचाºयांनी सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपाचा गुरूवारी तिसरा दिवस असून या संपाची शासनाने अद्याप कुठलीही दखल न घेतल्याने, कर्मचारी संघटनेतर्फे आज सकाळी ११ वाजता धुळे आगारात अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे प्रवाशांचे ऐन दिवाळीत हाल होत आहेत. प्रवाशांना खासगी वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे़ या संधीचा फायदा घेत खासगी व्यावसायिक देखील अव्वाच्या सव्वा भाडेआकारणी करीत आहेत. सरकार एसटी कर्मचाºयांच्या मागण्यांची गांर्भियाने दखल घेत नसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे सांगत एसटी कर्मचारी संघटनेने शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन केले़ सरकारविरोधी तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ महामंडळातील सर्व ७८० बसेस आगारांमध्येच लावण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयासमोरील रस्त्यांवर खासगी वाहने प्रवाशांची वाहतूक करीत आहेत़ प्रादेशिक परिवहन विभागाकडून अधिकाधिक खासगी वाहने रस्त्यावर उतरविण्याचे प्रयत्न सुरू असून खासगी वाहनांनी बसच्या दरांप्रमाणेच भाडेआकारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़