शिरपूर बाजार समितीला सात दिवस सुट्ट्या असल्याने माल विक्रीसाठी तोबा गर्दी

By अतुल जोशी | Published: March 27, 2023 06:56 PM2023-03-27T18:56:43+5:302023-03-27T18:57:15+5:30

शिरपूर बाजार समितीला सात दिवस सुट्ट्या असल्याने माल विक्रीसाठी तोबा गर्दी झाली. 

 As the Shirpur Bazar Committee had seven days of holidays, there was a rush to sell goods  | शिरपूर बाजार समितीला सात दिवस सुट्ट्या असल्याने माल विक्रीसाठी तोबा गर्दी

शिरपूर बाजार समितीला सात दिवस सुट्ट्या असल्याने माल विक्रीसाठी तोबा गर्दी

googlenewsNext

धुळे :  शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला विविध सुट्या, व्यापारी वर्षानिमित्त व हमाल बांधव सप्तश्रृंगी गडावर पायी वारीला जात असल्यामुळे २८ मार्च व ३ एप्रिल असे सलग ७ दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे सोमवारी मोठ्या प्रमाणावर भुसार माल विक्रीसाठी आला होता़ गहू व हरभऱ्याला अधिक भाव मिळत असल्यामुळे शेतकरी सध्या तरी समाधानी आहेत. दरम्यान, १५०-२०० वाहने,  ७०-८० बैलगाडीतून शेतीमाल विक्रीसाठी आला होता.

शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर शनिवारी व रविवारी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नाही़ आर्थिक वर्ष असल्यामुळे व्यापाºयांना खाते जुळवणीसाठी  २८ ते ३१ रोजी मार्केटला सुट्टी, १ रोजी शनिवार, २ रोजी रविवार असल्यामुळे पुन्हा सुट्टी मिळाली़ तसेच गेल्या २५ वर्षापासून हमाल-मापाडी बांधव सप्तश्रृंगी गडावर पायी वारी करत असल्यामुळे बंद ठेवले आहे. सोमवार, ३ एप्रिलपासून मार्केट  पूर्ववत सुरू होईल

 

Web Title:  As the Shirpur Bazar Committee had seven days of holidays, there was a rush to sell goods 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे