धुळे येथे ‘जीआयएस’द्वारे मालमत्तेची मोजणी

By admin | Published: June 3, 2017 02:49 PM2017-06-03T14:49:33+5:302017-06-03T14:49:33+5:30

यासाठी शासनाच्या पातळीवरून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आह़े

Assets counting by GIS at Dhule | धुळे येथे ‘जीआयएस’द्वारे मालमत्तेची मोजणी

धुळे येथे ‘जीआयएस’द्वारे मालमत्तेची मोजणी

Next

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 3 -  जीआयएस अर्थात ‘जिओग्रॉफिकल्स इन्फर्मेशन सिस्टिम’ (भौगोलिक माहिती प्रणाली) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मालमत्तेची मोजणी करण्यात येणार आह़े यासाठी शासनाच्या पातळीवरून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आह़े विशेष म्हणजे या मोजणीच्या पहिल्या टप्प्यात नाशिक विभागात धुळे शहराचा नंबर लागला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त तथा यंत्रणेचे नोडल अधिकारी अभिजित कदम यांनी  दिली़
मालमत्तेच्या मोजणीचे काम सॅटेलाइटद्वारे करण्यात येणार आह़े त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली होती़ पण स्थायी समितीच्या बैठकीत त्याची फेरनिविदा काढण्यावर सदस्यांचे एकमत झाल्याने मालमत्तेचे संगणकाद्वारे होणारे फेरमूल्यांकन रखडले होत़े फेरनिविदेची प्रक्रिया पूर्णत्वास आल्यानंतर मोजणीच्या कामाला गती येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होत़े 
येथील महापालिकेमध्ये आजअखेर सुमारे 70 हजार मालमत्ता नोंदविण्यात आलेल्या आहेत़ 1992-93 पासून शहरातील संपूर्ण मालमत्तांचीे फेरआकारणीची कार्यवाही करण्यात आलेली नाही़ जीआयएस प्रणालीद्वारे सव्रेक्षण करून मालमत्तांचे बांधकाम प्रकार, रहिवास, वाणिज्य, शासकीय इमारत, मंदिर आदींचे सव्रेक्षण करण्यात येणार आह़े त्यांचे नकाशे, फोटो काढणे, डाटा तयार करून संगणकीकृत करणे, मूल्यनिर्धारण डाटा ऑन करणे, ऑनलाइन मालमत्ता कर प्रणाली सुधारित दर फेरमूल्यांकन करण्याकरिता उपयोगात येईल़ कराची दर आकारणी, दरतक्ता समान पद्धतीने लागू करता येईल़ जुन्या-नव्या मालमत्तांना समान निकष लावता येईल़ करयोग्य मूल्य पद्धतीने किंवा भांडवली मूल्य पद्धतीने आकारणी प्रस्तावित करता येईल़ इमारतीचा घसारा निश्चित करता येईल़ जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे महानगरपालिकेच्या संपूर्ण हद्दीची उपग्रहाद्वारे प्रतिमा घेऊन सव्र्हे तयार करण्यात येणार आह़े जीआयएस तंत्रज्ञानात टाकून अहवाल तयार करता येईल़ प्रत्येक वर्षी किंवा दोन वर्षानंतर पुन्हा उपग्रहाद्वारे प्रतिमा घेऊन अगोदरच्या प्रतिमेतील फरक मिळू शकतो़  महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यास मोठी मदत मिळणार आह़े जीआयएस प्रणालीद्वारे सव्रेक्षण झाल्यास अंदाजित नियमित मिळणा:या मालमत्तेपेक्षा दुपटीने वाढ होईल, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला़
सद्य:स्थितीत 70 हजार मालमत्तांची नोंद महापालिकेच्या दप्तरी असली तरी मालमत्तेच्या मूल्यांकनानंतर निश्चित वाढ होणार आह़े पर्यायाने महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढच होईल़ पर्यायाने महापालिकेच्या उत्पन्नात अधिक वाढ होणार आह़े हे काम लवकरच सुरु होणे अपेक्षित आह़े

Web Title: Assets counting by GIS at Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.