सांगवी शिवारात कुºहाडीने केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 09:54 PM2020-05-24T21:54:53+5:302020-05-24T21:55:14+5:30
तिघांना दुखापत : सहा जणांविरुध्द गुन्हा
धुळे : पाण्याच्या पाईपावरुन दुचाकी चालविल्याने तो फुटला या कारणावरुन तिघांना मारहाण केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील सांगवी शिवारात शनिवारी दुपारी घडली़ याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ कुºहाडीसह लाकडी दांडक्याचा वापर झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़
शिरपूर तालुक्यातील सांगवी शिवारात गोपाल बद्री कुंभार यांच्या विट्टाभट्टीजवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे़ या पाईपलाईनवरुन दुचाकी गेल्याने ती फुटली़ ही घटना शनिवारी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास घडला़ या घटनेनंतर शाब्दिक चकमक उडाली़ यातून वाद निर्माण होत हाणामारीपर्यंत वेळ आली़ यात कुºहाड आणि लाकडी दांडक्याचा वापर झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ यात साहेबराव केशव देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा जगदीश आणि भाऊ हिरालाल यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याने यात तीन जण जखमी झाले आहेत़ त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़
याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात साहेबराव केशव देशमुख (५५, रा़ सांगवी ता़ शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, गोपाल बद्री कुंभार (प्रजापती), ललित गोपाल कुंभार (प्रजापती), बलराम गोपाल कुंभार (प्रजापती), अनिल गोपाल कुंभार (प्रजापती), काना गोपाल कुंभार (प्रजापती), ग्यारशीबाई गोपाल कुंभार (प्रजापती) (सर्व रा़ जुनी सांगवी ता़ शिरपूर) यांच्या विरोधात संशयावरुन शनिवारी रात्री साडेनऊ वाजता विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़ एस़ एस़ नगराळे घटनेचा तपास करीत आहेत़