घराबाहेर झोपलेल्या तरुणावर हल्ला

By admin | Published: June 2, 2017 12:55 AM2017-06-02T00:55:13+5:302017-06-02T00:55:13+5:30

पिळोदा येथील घटना : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Attacked young man outside the house | घराबाहेर झोपलेल्या तरुणावर हल्ला

घराबाहेर झोपलेल्या तरुणावर हल्ला

Next

धुळे : शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथे मासे विक्रीसाठी घेत नसल्याच्या कारणावरून घराबाहेर झोपलेल्या तरुणावर पाच जणांनी हल्ला केला़ त्याला लाठय़ा-काठय़ा, दुचाकीच्या चेनने मारहाण करून जखमी केल़े ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली़ याप्रकरणी पाच जणांविरुद्ध बुधवारी थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
नीलेश हिरामण नेतकर (रा़ पिळोद ता़ शिरपूर) असे जखमी तरुणाचे नाव आह़े त्याने थाळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधा मला पावरासह इतरांकडून मासे विक्रीसाठी घेत नसल्याच्या कारणावरून त्याच्यासह पाच जणांनी सोमवारी मध्यरात्री 1़30 वाजेच्या सुमारास घरासमोर अंगणात झोपलेलो असताना लाठय़ा-काठय़ा व दुचाकीच्या चेनने मारहाण केली़ त्यात नीलेश हा जखमी झाला़ याप्रकरणी बुधा पावरासह राजेंद्र श्यामराव कोळी, संगीता गोपाल कोळी (रा़ पिळोदा) बन्सी बुधा पावरा, महेंद्र बुधा पावरा (रा़ हिसाळे, ता़ शिरपूर) यांच्याविरुद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 143, 147, 148, 149, 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ. बापू पाटील करीत आहेत़
आविष्कार कॉलनीत एकास मारहाण
धुळे शहरातील आविष्कार कॉलनीत सोमवारी सकाळी अकिला बेग अफसर बेग व हुडको येथील मुलांचे भांडण सुरू होत़े त्यामुळे असलम शेख शौकत (रा़ आविष्कार कॉलनी, धुळे) हे भांडण सोडविण्यासाठी गेल़े या कारणावरून त्यांना सोनू प्लंबर युसूफ शेख याने दगड मारून जखमी केल़े, तर नदीम खान, समीर शहा, समीर धोबी (पूर्ण नाव-गाव माहीत नाही) सर्व रा़ पूर्व हुडको कॉलनी यांनी मारहाण केली़ याप्रकरणी असलम शौकत यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े
त्यावरून बुधवारी वरील चौघांविरुद्ध  भादंवि कलम 337, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही़सी़ मोरे करीत  आहेत़
हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ
चारित्र्याचा संशय घेऊन व हुंडा दिला नाही, या कारणावरून हेमलता उर्फ अंजली मनोज दाभाडे (रा़ नांदगाव, जि़ नाशिक, ह़मु. वर्षावाडी ता़ धुळे) या विवाहितेचा सासरी वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला़ तिच्या अंगावरील सोन्याचे एकूण साडेपंधरा ग्रॅम वजनाचे दागिने काढून घेतले. हा प्रकार सुमारे दोन वर्षापासून ते 13 मे 2017 दरम्यान घडला़
याप्रकरणी अंजली दाभाडे हिने मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनोज आनंदा दाभाडे, आनंदा नामदेव दाभाडे, सिंधूबाई आनंदा दाभाडे, समाधान आनंदा दाभाडे, मंगेश आनंदा दाभाडे, वृषाली संतोष दाभाडे (सर्व रा़ नांदगाव) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 498 अ, 406, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रामराजे करीत आहेत़

Web Title: Attacked young man outside the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.