हा तर ग्राहक लुटीचा वीज मंडळाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:51 PM2019-03-14T22:51:09+5:302019-03-14T22:51:35+5:30

आरोप : वीज कायदा व नियामक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन

This is the attempt of the looted power board | हा तर ग्राहक लुटीचा वीज मंडळाचा प्रयत्न

हा तर ग्राहक लुटीचा वीज मंडळाचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मीटरचे सील व अन्य बाबीवरुन ग्राहकाने मीटरमध्ये काहीही फेरफेर केलेला नाही याचा पंचनाम्यात उल्लेख असताना मीटर हे सदोष असल्याचे दाखवून अवास्तव बील आकारण्यात आले़ यावरुन ग्राहकाची लूट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज्य वीज ग्राहक संघटनेने केलेला आहे़ वीज कायदा व वीज नियामक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे समोर आले आहे़ 
देवपूर विभागाच्या भरारी पथकाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी वाडीभोकर रोडच्या पंडीत लिला कॉम्प्लेक्समध्ये व्यवसाय करणाºया एका ग्राहकाच्या मीटरची तपासणी करण्यात आली़ मीटर हळू चालत असल्याचे कारण दाखवून मागील १८ महिन्यांचे ८ लाख रुपयांच्या थकबाकीचे बिल दिले़ ग्राहकास गेली चार वर्ष जे बील येत आहे, त्याच पध्दतीने आताही बिल येत होते़ पण, वीज मंडळाने मागील १९ महिन्यांपासून मीटर सदोष आहे हे दाखवून चुकीचे व आवास्तव बिल आकारले़ सदरहू ग्राहकाने वीज बिल का जास्त आले याकरीता वीज मीटरच्या नोंदी संबंधिचे एमआरआय रिपोर्टची सातत्याने मागणी केली़ परंतु वीज मंडळाने ती दिलेली नाही़ परिणामी विजबिल चुकीचे व अवास्तव आहे असे संघटनेला वाटत आहे़ विजेचे बिल न भरल्याने ग्राहकाचा वीज पुरवठा ६ मार्च २०१९ रोजी वीज कायदा २००३ चे कलम ५६ व १७१ चे उल्लंघन करुन खंडीत करण्यात आले़ वीज तोडण्यापुर्वी ग्राहकाला तशी नोटीस द्यावी लागते़ 
तसेच तशी सुचना बिलामध्ये नमूद न करता स्वतंत्रपणे ग्राहकास पोहचविली जावून त्याच्याकडून ती मिळाल्याची पोचपावती घेतली जाणे आवश्यक आहे़ ग्राहकास चुकीचे व अवास्तव बिल दिल्यास वीज कायदा २००३ मधील कलम ५६ नुसार वीज बिलांची मागील सहा महिन्यांची सरासरी रक्कम अथवा चुकीचे पूर्ण बिल यापैकी जी रक्कम कमी असेल ती भरली असता ग्राहकाचा वीज पुरवठा तोडता येत नाही़ 
कायद्यात तशी तरतूद असताना बिलाची तक्रार करायला ग्राहक स्थानिक कार्यालयात गेल्यावर त्याला अगोदर बिलाची पूर्ण रक्कम भरायला भाग पाडले जाते़ मुळात हे चुकीचे आहे़ महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनीकर यांच्याशी चर्चा केल्यावरही त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे़ ग्राहकाचे रोज १५ हजाराचे नुकसान भरुन देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे़
नुकसान भरपाई महावितरणने द्यायला हवी
वीज मंडळाच्या भरारी पथकाने दोन दिवसांपुर्वी दिलेल्या तीन महिन्यांच्या एमआरआय रिपोर्टवरुन वीज मिटर हळू चालते असे सिध्द होत नाही़ पण, गेल्या १९ महिन्यांचा एमआरआय रिपोर्ट द्यायला असमर्थता का दाखविली जाते याचे कारण कळत नाही़ अवास्तव व चुकीचे विजबिल देण्याची पध्दत म्हणजेच ग्राहकाची लूट करण्याचा प्रयत्न आहे़ यासंदर्भात संबंधित अधिकाºयांनी आपली चूक मान्य करुन संबंधित ग्राहकाचा वीज पुरवठा त्वरीत चालू करावा, होणारी नुकसान भरपाई स्वत:च्या खिशातून भरुन द्यावी़ असे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रा़ शाम पाटील, सचिव वर्धमान सिंघवी यांचे म्हणणे आहे़ 

Web Title: This is the attempt of the looted power board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे