रेल्वेने परप्रातियांना सोडण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:46 PM2020-05-04T22:46:37+5:302020-05-04T22:46:54+5:30
प्रवासी पासेस : आतापर्यंत २६२ नागरिकांचे अर्ज, संबंधित प्रशासनाच्या परवानगीनंतर निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : इतर राज्यातील ५६६ नागरिकांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी परवानगी मागितली असून त्यापैकी ३७ नागरिकांना प्रशासनाने प्रवासी पास दिल्याची माहिती नोडल अधिकारी तथा जिल्हा पूनर्वसन अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी दिली़
लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या ५६६ नागरीकांपैकी २०० नागरीक उत्तरप्रदेशातील स्थलांतरीत मजुर आहेत़ त्यांना पासेसे देण्यापेक्षा त्यांच्यासाठी स्वतत्र रेल्वे सोडण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे़ जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या परवानगीने मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील विभागीय कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन युपीसाठी स्वतंत्र रेल्वे सोडण्याची सोडण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहितीही प्रज्ञा मिसाळ यांनी दिली़
दरम्यान, महराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आतापर्यंत २६२ नागरीकांनी आॅनलाईन अर्ज केले असून या नागरीकांना परवानगी द्यावी किंवा नाही याबाबत संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी आल्यावर निर्णय घेण्यात येणार आहे़
पुणे आणि नाशिक येथे जाण्यासाठी १४३ अर्ज आले आहेत़ मुंबई आणि मुंबई उपनगरांसाठी ६६ अर्ज, मराठवाडा आणि विदर्भातील अमरावतीसाठी १४, औरंगाबादसाठी २९ आणि नागपूरला जाण्यासाठी १० अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़
धुळे जिल्ह्यातून त्यांच्या इच्छित स्थळी (राज्याबाहेर) जाण्याचे पास, ना हरकत देण्यासाठी, आवश्यक असलेली परवानगी देण्याकरिता जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बढे- मिसाळ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाच्या एक मे रोजीच्या सुधारित आदेशानुसार लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात अडकलेले स्थलांतरीत कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना धुळे जिल्ह्यातून त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी व धुळे जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी सक्षम प्राधिकारी आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील आदेश दिले आहेत. प्रवासी पाससाठी ँ३३स्र२://ूङ्म५्र1ि9.ेँस्रङ्म’्रूी.्रल्ल या आॅनलाइन संकेतस्थळावरील प्राप्त अर्जांवर जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती बढे कार्यवाही करतील.
तसेच महाराष्ट्र राज्यांतर्गत प्रशासकीय विभागनुसार पास देण्यासाठी व ना हरकत देण्यासाठी देखील नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेश व कोकण विभागासाठी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, पुणे महानगर प्रदेश व नाशिक विभागासाठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण, अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागासाठी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़
नोडल अधिकाऱ्यांनी आॅनलाइन संकेतस्थळावर प्राप्त अर्जांवर कार्यवाही करावयाची आहे. शासन आदेशात नमूद पध्दतीने या अधिकाºयांनी कामकाज करावयाचे आहे, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत़
दरम्यान, परप्रांतीय कामगारांसाठी रेल्वेची सोय करण्याचे काम सुरू असून त्यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी करु नये़
तातडीच्या शस्त्रक्रीयेसाठी रुग्णाला परवानगी
मुंबई महानगर प्रदेश आणि कोकण विभागात आपल्या मुळ गावी परत जाण्यासाठी आतापर्यंत ६६ नागरीकांनी प्रवासी पास मिळविण्याकरिता आॅनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत़ त्यात धुळे जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे़ या रुग्णाला स्वादुपिंडाचा त्रास असल्याने तातडीने शस्त्रीक्रीया करणे आवश्यक होते़ त्यासाठीचे आवश्यक ते वैद्यकीय पुरावे रुग्णाने सादर केल्यानंतर तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना मुंबईला जाण्याची परवानगी दिल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश आणि कोकण विभागाचे नोडल अधिकारी तथा निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी लोकमतला दिली़