अविनाश देवरे राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी
By Admin | Published: February 3, 2017 11:53 PM2017-02-03T23:53:30+5:302017-02-03T23:53:30+5:30
जयहिंद कॉलनीतील अविनाश वसंतराव देवरे यांना 2017 चा विशिष्ट सेवा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.
धुळे : येथील जयहिंद कॉलनीतील अविनाश वसंतराव देवरे यांना 2017 चा विशिष्ट सेवा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वायुसेनेत वर्षानुवर्षे उत्कृष्ट काम करणा:यांना देण्यात येतो. ते सध्या दिल्ली येथे वायुसेना भवनमध्ये डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत.
लवकरच नियोजित कार्यक्रमात राष्ट्रपतीच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शत्रूराष्ट्र आपल्या देशाच्या विरोधात करत असलेल्या हालचाली ‘रडारच्या माध्यमातून टिपल्या जातात. यासाठी महत्त्वाचे सॉफ्टवेअर सन 2000 मध्ये देवरे यांनी विकसित केले आहे. या संशोधनामुळे भारतीय वायुदलात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या 29 वर्षापासून ते वायुसेनेत महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहेत. अविनाश देवरे हे जयहिंद हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त स्व.व्ही.डी. देवरे यांचे सुपुत्र आहेत. यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.