धुळ्यात उत्कृष्ट काम करणा-या ५६ आशा कर्मचा-यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 05:10 PM2018-03-27T17:10:27+5:302018-03-27T17:10:47+5:30

जिल्हा परिषद : पंचायत समितीच्या सभागृहात झाला कार्यक्रम

Awards to 56 Asha Workers for doing Excellent work in Dhundi | धुळ्यात उत्कृष्ट काम करणा-या ५६ आशा कर्मचा-यांना पुरस्कार

धुळ्यात उत्कृष्ट काम करणा-या ५६ आशा कर्मचा-यांना पुरस्कार

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील आशा कर्मचाºयांना पुरस्कार देण्यासाठी निवड समितीने केलेली निवड ही योग्य आहे. आशा कर्मचारी जिल्ह्यात करत असलेले काम स्तुत्य आहे. त्यांना भविष्यात येणाºया अडचणी सोडविण्यासाठी पाहिजे, ती मदत केली जाईल, असे जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी येथे आश्वासित केले. पंचायत समितीच्या सभागृहात झाला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  आशा स्वयंसेविका कर्मचाºयांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय व शासकीय पातळीवर संघर्ष करावा लागतो. आशा कर्मचाºयांचे प्रलंबित प्रश्न व इतर मागण्या निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील असून त्यादृष्टीने येणाºया काळात प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी येथे केले. 
पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी दुपारी जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका पुरस्काराचे वितरण झाले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, पंचायत समितीचे सभापती अनिता पाटील, उपसभापती दिनेश भदाणे, जिल्हा माता व बालसंगोपन डॉ. चारूलता पवार, गटविकास अधिकारी सी. के. माळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा आशा समन्वयक सरिता पाटील यांनी आशा कर्मचाºयांच्या समस्या येथे मांडल्या. 
आशा कर्मचारी गावाच्या डॉक्टर 
 आशा कर्मचारी या गावाच्या डॉक्टरच असतात. मात्र, त्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत आशा कर्मचाºयांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनाकडे नक्कीच प्रशासनामार्फत पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्यातील आशा कर्मचाºयांचे कामही उत्कृष्ट सुरू असल्याचेही त्यांनी येथे सांगितले 
...तर कारवाई करणार 
जिल्हा परिषदेत आशा कर्मचाºयांना मिळणाºया मानधनाबाबत कार्यवाही होत नसल्याची अनेकदा ओरड होत असते. त्यासाठी आता आशा कर्मचाºयांचे मानधन काढण्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र लिपीक नियुक्त केला आहे. तरीही आशा कर्मचाºयांचे मानधन निघत नसले, तर कर्मचाºयांनी तक्रार करावी, निश्चितच संबंधितावर कारवाई केली जाईल, असे आवाहन सीईओ गंगाथरन देवराजन यांनी येथे केले. 

चिमुकलीवर असलेले आईचे छत्र गेले; 
आशा कर्मचा-याने दिला आधार 
मंगळवारी आयोजित कार्यक्रमात जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका पुरस्कार समितीने निवड केलेल्या ५६ आशा कर्मचा-यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात साक्री तालुक्यातील कुडाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चिमा मनोज चौधरी यांना विशेष असा जिल्हास्तरीय आरोग्य सखी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कुडाशी येथील एका महिलेला जुळ्या मुली झाल्या होत्या. पैकी एक मुलीचा मृत्यू झाला. तसेच जन्मदेती आईचा देखील मृत्यू झाल्याने राहिलेल्या एका मुलीचा सांभाळ करण्यास ‘त्या’ मुलीचा सांभाळ करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत चिमा चौधरी यांनी त्या मुलीचा सांभाळ करण्यास ठरविले. ही माहिती कार्यक्रमात दिल्यानंतर सभागृहात उपस्थित अनेकांचे डोळ्यात पाणी तरळल्याचे चित्र दिसून आले. 

Web Title: Awards to 56 Asha Workers for doing Excellent work in Dhundi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.