्र्रपथनाट्याद्वारे केली स्वच्छतेविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:03 PM2019-09-18T23:03:44+5:302019-09-18T23:04:30+5:30

महापालिका : स्वच्छता हीच सेवा मोहिमेंतर्गत शहरात विविध उपक्रमांतून प्रबोधन

Awareness about cleanliness made by slogans | ्र्रपथनाट्याद्वारे केली स्वच्छतेविषयी जनजागृती

dhule

googlenewsNext

धुळे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छता हीच सेवास्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे़ या मोहिमेत कमलाबाई कन्या शाळेतील विद्यार्थींनी सहभाग नोदवत मनपाच्या प्रवेशद्वारसमोर पथनाट्य सादर करून प्रबोधन केले़
आगामी विधानसभा निवडणुकीत नागरिकांसह तरूणांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदार राजा जागा हो ! या विषयावर विद्यार्थींनी पथनाट्यातून जनजागृती केली़ तर प्लास्टिक बंदी तसेच स्वच्छ व सुंदर धुळे होण्यासाठी प्रत्येकाने घरापासून स्वच्छतेचा संकल्प करण्याचे आवाहन बुधवारी कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी महानगर पालिकेच्या आवारात सादर केलेल्या पथनाट्यातून केले़ या पथनाट्याला उत्तम प्रतिसाद मिळाला़ या पथनाट्यचे लेखन व दिग्दर्शन कलाशिक्षक केदार नाईक यांनी केले होते़ तर वैष्णवी राव, ऐश्वर्या हेंबाडे, प्रियांका महाले, स्नेहल अमृतसागर, प्राप्ती चव्हाण, अभिज्ञा खालाणे, पायल पाटील, साक्षी कोठावदे, तेजस्विनी दुसाने, साक्षी महाजन, रुक्मिणी कुलकर्णी या विद्यार्थिनींनी सादर केले़ पर्यवेक्षिका हेमलता बागुल, शालिनी चव्हाण, मनपाचे चंद्रकांत जाधव, अनिल साळुंखे, वाईद अली यांनी विद्यार्थ्यांचे सुंदर सादरीकरणासाठी कौतुक केले़

Web Title: Awareness about cleanliness made by slogans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे