पथनाट्यातून मुलांच्या सुरक्षेबाबत जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:58 PM2017-10-02T15:58:27+5:302017-10-02T16:00:21+5:30
भारत यात्रा : आर. आर. पाडवी नूतन विद्यालय व शहरात प्रबोधनात्मक कार्यक्रम
अधिकारी रत्ना वानखेडकर, संगीता पाटील, गायत्री भामरे, जगदीश झिरे, योगेश धनगर, जयेश चौधरी, दीपक रंधे, मनीषा शिंदे आदी उपस्थित होते.
मुलांशी संवाद साधा!
भारत यात्रेचे प्रमुख भगवान तिगले व इतर मान्यवरांनी केलेल्या मनोगतात सांगितले, की घरात मुलांशी बोलावे. बडबड करणारी मुले शांत राहिली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधा. मुले अडचणीत असतील, तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्या. सार्वजनिक ठिकाणी मुलांची काळजी घ्या. बहुतांश मुलांचा घरांमध्ये आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांद्वारे गैरवापर केला जातो. त्यासाठी पालकांनी सजग रहावे.
शिक्षण व सुरक्षेसाठी केवळ ४ टक्के खर्च
भारत यात्रेदरम्यान प्रबोधनात्मक पत्रक वाटप करण्यात आले. त्यात म्हटले आहे, देशात दर सहा मिनीटांना १ बालक बेपत्ता होते. साडे चार लाखांपेक्षा जास्त मुले हे तस्करीचे बळी पडतात. त्यांची व्यावसायिक आणि लैंगिक शोषणासाठी खरेदी किंवा विक्री केली जाते. देशाची एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुलांचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. परंतु, त्यांचे शिक्षण आणि सुरक्षेसाठी देशाच्या अंदाजपत्रात केवळ ४ टक्के खर्च होत असल्याचे सांगण्यात आले आहे.