मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:21 PM2019-09-09T12:21:17+5:302019-09-09T12:21:49+5:30
जिल्हाभरात उपक्रम : शाळा, महाविद्यालयांकडून रॅली काढून आवाहन
धुळे : लोकसभेच्या गतनिवडणूकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांतर्फे रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
़विखरण शाळेतर्फे रॅली
शिरपूर- तालुक्यातील विखरण येथील साने गुरुजी सेमी इंग्रजी प्राथमिक, तांत्रिक, माध्यमिक व क्रांतिविरांगना लिलाताई पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅली काढून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
पुढील कोणत्याही निवडणुकीत १८ वर्षापुढील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन रॅलीतून करण्यात आले.
मतदार जागृतीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एम.सनेर, स्वच्छता अभियानाबद्दल एन.पी. कापडे यांनी तर साक्षरता अभियानाबद्दल प्रल्हाद डी.सोनार यांनी मार्गदर्शन केले. व्ही.ए. पाटील, सी.एम. शिरसाठ, एस.एस. डोळे यांनी रॅलीचे संयोजन केले. पर्यवेक्षक एस.आर. पाटील यांच्या मदतीने एस.बी. विखरणकर, एस.आर. बच्छाव, प्रा.वाय.एस. सावंत, आर.पी. पवार, एस.एस. पवार, एच.ए. हिरे, आर.एम. पावरा, बी.डी. सिसोदिया, एस.एस. ईशी यांनी अभियानांसाठी सहकार्य केले.
विखरण गावातील मुख्य चौकात ग्रामस्थांना एकत्रित करुन या अभियानाविषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन धोंडू झिंगा पाटील, शालेय परिवहन समितीचे उपाध्यक्ष संतोष शिंदे, पालक शिक्षक संघाचे मिनाक्षी महेंद्र पाटील, राजश्री निलेश पाटील, भिमराव निंबा मराठे, अरुण नवल पाटील, वैशाली अनिल सावळे, नुतन गोरखनाथ पाटील, दगा गंगाराम पाटील, प्रविण मार्तंड पाटील यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते. रॅली यशस्वीतेसाठी एम.ए. बुवा, डी.एल. ढिवरे व एम.बी. रंधे यांनी परिश्रम घेतले़
देऊर येथे रॅली
धमाने- तालुक्यातील देऊर बु. येथील कॅप्टन विश्वासराव देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कै.डॉ.अस्मिता दिघावकर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देऊर येथे मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. सकाळी गाव दरवाजापासून रॅलीला सुरूवात झाली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोस्टर हाती घेऊन विविध घोषणा दिल्या. कार्यक्रमासाठी देवरे विद्यालयाचे प्राचार्य ए.ए. पगारे, दिघावकर विद्यालयाच्या प्राचार्या स्वरूपा देवरे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
नूतन माध्यमिक विद्यालय
कापडणे- नूतन माध्यमिक विद्यालयातर्फे मतदान जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी. माळी, एस.पी. एंडाईत, ए.डी. पाटील, बी.ए. माळी, एस.सी. महाजन, व्ही.डी. शिरसाठ, के.एल. ठाकरे, पी.सी. धनगर, जी.वाय. जगताप, व्ही.आर. माळी, एल.डी. खलाणे, डी.डी. सोनवणे, आर.बी. पाडवी, एस.एस. माळी, वाय.आर. खलाणे, ए.डी. जैन यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.
कासारे येथे जनजागृती
कासारे- मतदान जागृतीसाठी येथील माध्यमिक विद्यालयांच्यावतीने रॅली काढण्यात आली. त्यात येथील बहुउद्देशीय विद्यालय व वसंतरावदादा पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची फलक व घोषणा देत जनजागृती केली. बॅण्ड पथकासह विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले. रॅलीचा समारोप बाजारपेठेत लोकनियुक्त सरपंच विशाल देसले व प्रवाशी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. बहुउद्देशीय विद्यालयाचे मुख्याध्यापक के.डी. सोनवणे, वसंतराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एस. बच्छाव व सर्व शिक्षक- शिक्षिकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.