बाबासाहेबांची जयंती घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:20 PM2020-04-13T22:20:35+5:302020-04-13T22:20:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा घरातच साजरी होणार आहे़ कोरोना विषाणुचा संसर्ग ...

Babasaheb's birth anniversary at home | बाबासाहेबांची जयंती घरातच

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा घरातच साजरी होणार आहे़
कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रम आणि मिरवणुका रद्द करण्याचा निर्णय समाजाने यापूर्वीच घेतला आहे़ नागरीकांनी घरात राहूनच बाहेसाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह रिपाई आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे़
दरम्यान, दरवर्षाप्रमाणे याही वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह कायम आहे़ शहरासह जिल्ह्यात बाबासाहेबांच्या स्मारकांना रंगरंगोटी आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ जयंतीच्या पार्श्वभूमीवर कपडे बाजारात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते़ यंदा लॉकडाउनमुळे दुकाने बंद असल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले आहे़
धुळे शहरात भीमनगर, वाडीभोकरसह विविध भागात विद्युत सजावट केली आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुर्णाकृती पुतळा स्मारकाचीही सजावट करण्यात आली आहे़ याठिकाणी मध्यवर्ती जयंती समितीचे मोजके पदाधिकारी सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा पाळून अभिवादन करणार आहेत़ सकाळी साडेनउला हा कार्यक्रम होईल़ यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह २५ जण उपस्थित असतील़ कडेकोट बंदोबस्त असेल़ जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे़ धुळे जिल्हा पोलिस दलातर्फे देखील शासकीय जयंती साजरी होणार आहे़

Web Title: Babasaheb's birth anniversary at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे