मातांसह बाळाची काळजी घेतली जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:37 PM2021-01-24T22:37:02+5:302021-01-24T22:38:14+5:30

वैद्यकीय अधिक्षक डाॅ.अश्विनी भामरे यांचे मत

The baby is taken care of with the mother | मातांसह बाळाची काळजी घेतली जाते

dhule

Next

चंद्रकांत साेनार 
कोरोना संर्सग काळापासुन जिल्हा रूग्णालयातील प्रसृतीगृह बंद होते. त्यामुळे गरोदर महिलांना गैरसोय सहन करावी लागली. महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा रूग्णालयात प्रसृतीगृह सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाची नागरिकांची भिती असल्याने थोडा प्रतिसाद कमी आहे. मात्र घाबरून जाण्याचे काही कारण नाही. गरोदर माता व बाळाची  काळजी घेतली जात आहे. येथील स्त्री गृहातील प्रसृतीगृहासाठी महिन्याभरापुर्वी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्या निधीतून सुसज्ज प्रसृतीगृह निर्माण होईल अशी माहिती जिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डाॅ. अश्विनी भामरे यांनी दिली.

प्रश्न : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी कशी काळजी घेतली जाते.
उत्तर : कोरोना संर्सग होऊ नये, यासाठी जिल्हा रूग्णालयातील स्त्री प्रसृती गृहात गरोदर माता व बाळाची काळजी घेतली जाते. त्यासाठी दिवसभरातुन तीन वेळा वार्ड सॅनेटराईझर केले जाते. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवले जाते.  डाॅक्टर, नर्स, वार्डबाय  अशा सर्वांना मास्क लावण्याची सक्ती केलेली आहे. तसेच कोरोनाची चाचणी झाल्यावर  दाखल केले जाते.
प्रश्न : कोरोना संक्रमण काळात गरोदर महिलांना कशी काळजी घ्यावी?
उत्तर : कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे़ ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते़ बाधित व्यक्तीपासून गरोदर माता व बालकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता असते.  या काळात गरोदर मातांनी शक्य असल्यास घरातच राहावे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, तोडाला मास्क व हाताला सॅनिटायझर लावावे.
जिल्हा रूग्णालयात किती गरोदर 
महिला उपचार घेत आहेत.
उत्तर : प्रसृतीगृह पंधरा दिवसापुर्वी सुरू करण्यात आले आहे. एका महिलेची प्रसृती सुखरूप झालेली आहे. तर दहा गरोदर महिलांची प्रसृती व उपचारासाठी नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यांना मोफत उपचार व तपासणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रूग्णालय सुरू झाल्याची माहिती अद्याप नसल्याने थोडा परिणाम दिसुन येतो. गरोदर महिला व बाळाची काळजी स्वतंत्र पेटीची व्यवस्था केलेली आहे. तसेच वैद्यकीय उपचारासाठी पंधरा डाॅक्टर व अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. 
घाबरू जावू नका सल्ला घ्या !
कोरोनाबाबत अद्याप पुरेशाप्रमाणात जनजागृती समाजामध्ये नसल्याने सर्दी किंवा खोकला जरी झाला तरी घाबरून डॉक्टरांकडे येतात़ मात्र घाबरून जावू नका, पण खबरदारी देखील घेण्याची गरज आहे़शंभर पेक्षा जास्त ताप, सर्दी, सतत खोकला, श्वास घेण्याचा त्रास तसेच संशयित व्यक्तीशी संर्पक आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या़
हातधुतल्या शिवाय स्पर्श करू नका
आपल्या हातावरील विषाणू नाका, तोंडाद्वारे शरीरात शिरकाव करतात़ त्यामुळे कोरोना सारखा महाभयंकर आजार होण्याचा धोका असतो़ हा धोका टाळण्यासाठी वेळोवेळी हातधुणे महत्वाचे आहे़ शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे किंवा बाहेरून आल्यानंतर मुलांना स्पर्श करण्यापूर्वी हात पाय पाण्याने स्वच्छ धुवावे़ 
जनजागृती करणार 
कोराेनाचे सध्या प्रमाण कमी झाल्याने येथील प्रसृतीगृह सुरू करण्याची मागणी केली होती. महिलांना माहिती होण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. 

Web Title: The baby is taken care of with the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे