पोलिसांकडून कठोर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 08:36 PM2020-05-17T20:36:00+5:302020-05-17T20:36:23+5:30
लॉकडाउनमध्ये गर्दी : लाठीचा प्रसाद अन आर्थिक भूर्दंड, आतापर्यंत 000 वाहनांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्याच्या बहाण्याचे लॉकडाउनमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसांनी अधिक कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे़
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे़ विनाकारण बाहेर पडू नये, सोशल डीस्टन्सिंगची मर्यादा पाळावी, घरातच थांबावे, शहरात गर्दी करु नये, असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे़ परंतु धुळेकरांनी प्रशासनाच्या या आवाहनाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे़ गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरुवातीला पोलिसांनी आपल्या वाहनांवर असलेल्या ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून जाहीर आवाहन करीत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला़ अनेकदा पोलिसांनी भावनिक आवाहनही केले़ परंतु धुळेकरांनी त्यालाही प्रतिसाद दिला नाही़ त्यामुळे मध्यंतरी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर करुन लाठीचा प्रसाद देणे सुरु केले़ त्यानंतर शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले होते़ परंतु लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यापासुन काही उद्योग, व्यवसाय आणि जीवनावश्यक वस्तुंसाठी शासनाने मोठी शिथीलता दिली़ शिवाय प्रवास करण्याची परवानगी दिली़ ही परवानगी आवश्यकता असणाऱ्यांसाठी होती़ परंतु धुळेकरांनी याचाही विपर्यास करीत गर्दी करायला सुरुवात केली आहे़ गेल्या दीड महिन्यांपासुन घरात असलेले नागरिक जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने पोलिसांनी देखील आपली मोहिम काहीशी शिथील केली होती़
परंतु गेल्या दोन दिवसात शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे़ दरम्यान रविवारी राज्याचा लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई सुरु केली आहे़
महानगरपालिका चौकासह शहरातील विविध चौकांमध्ये पोलिसांनी कमांडो पथकाने कारवाई करीत विनाकारण फिरणाºया आणि नियम न पाळणाºया वाहनचालकांना लाठीचा प्रसाद दिला़