विजेच्या तारा अंगावर पडल्याने विरदेल येथील बैलजोडी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:33 PM2018-06-15T12:33:37+5:302018-06-15T12:58:13+5:30
चिलाणे भागातील दुर्घटना : जखमी तरुणावर उपचार सुरु, गावात हळहळ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : तालुक्यातील विरदेल येथील शेतकरी श्री साहेबराव उत्तम माळी (४५, रा़ विरदेल ता़ शिंदखेडा) यांच्या चिलाणे शिवारातील शेतात कपाशी पिकाची कोळपणी करतांना विजेची मेन लाईन वरील तार पडून दोन बैल ठार झाले व त्यांचा पुतण्या दिपक माळी (३५) करंट लागून गंभीर जखमी झाला आहे़
त्यांना उपचारासाठी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे़ सदर घटना सकाळी ७ वाजता घडली आहे़ गावकºयांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क करून देखील कोणी अद्याप आले नसल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे़ विरदेल येथील शेतकरी साहेबराव माळी यांचा पुतण्या दीपक माळी हा चिलाणे शिवारातील शेतात सकाळी ७ वाजेच्या सुमारास कपाशी पिकाची कोळपणी करत असतांना त्यांच्या शेतातून विजेची मेन लाईन गेली आहे़ त्याच्या शेतातील पोलवर वायर तुटून त्याचे करंट एका बैलाला लागले़ बखर लोखंडी असल्याने त्यातुन दुसºया बैलाला सुध्दा करंट लागले़ औत हाकणारा दीपक माळी यालाही जबरदस्त करंट लागून गंभीर जखमी झाले आहेत त्याला उपचारासाठी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ सदर घटना ही वीज वितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे़ कारण या बाबत शेतकºयांनी तक्रार करून देखील कर्मचाºयांकडून दुरुस्ती केली गेलेली नाही़ त्याचा फटका नाहक ऐन पावसाळ्यात शेतकºयाला बसला आहे़