'पठाण'ला बजरंग दलाचा विरोध, धुळ्यात थेटअरटरमध्ये घुसून फाडले पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 04:25 PM2023-01-25T16:25:53+5:302023-01-25T16:26:02+5:30

शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाही, त्याच दरम्यान निर्मात्यांनी चित्रपटातील दुसरे गाणे 'झूमे जो पठाण' देखील रिलीज केले आहे.

Bajrang Dal's opposition to 'Pathan', protests by breaking into theaters in Dhule | 'पठाण'ला बजरंग दलाचा विरोध, धुळ्यात थेटअरटरमध्ये घुसून फाडले पोस्टर्स

'पठाण'ला बजरंग दलाचा विरोध, धुळ्यात थेटअरटरमध्ये घुसून फाडले पोस्टर्स

googlenewsNext

बॉलिवूड बादशहा शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या बहुचर्चित 'पठाण' (Pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण त्याच्या चित्रपट आणि गाण्यांबद्दलचा वाढता वाद काही संपत नाहीये. त्याच्या चित्रपटाला सातत्याने विरोध होत आहे, अशा परिस्थितीत शाहरुखचे चाहते त्याला पूर्ण पाठिंबा देत आहेत. चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या वादामुळे शाहरुखच्या फॅन फॉलोइंगवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. तरीही काही ठिकाणी या चित्रपटाला विरोध केला जात आहे. धुळे शहरातील सिनेमागृहात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थेअटरमध्ये घुसून पठाण विरुद्ध आंदोलन केले. 

शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाही, त्याच दरम्यान निर्मात्यांनी चित्रपटातील दुसरे गाणे 'झूमे जो पठाण' देखील रिलीज केले आहे. या गाण्यातील शाहरुख आणि दीपिका पादुकोणची केमिस्ट्री चाहत्यांना पसंत पडत आहे. हे गाणे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. चाहते किंग खानवर किती प्रेम करतात याचा हा पुरावा आहे. पण, काहीजण शाहरुखला विरोधही करतात. शाहरुखच्या पठाण या चित्रपटालाही ते विरोध करत आहेत. 

धुळे शहरात बजरंग दल आणि हिंदुत्त्ववादी संघटनांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. बजरंग दलाने धुळे शहरातील जोती टाकी आणि ॲडलब सिनेमाबाहेर आंदोलन केले आणि मल्टिप्लेक्स आणि थिएटरमध्ये पठाण चित्रपट चालू न देण्याची धमकी दिली. शहरातील ॲडलब चित्रपटगृहात आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाचा निषेध करत पोस्टर फाडले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. चित्रपट उशिराने सुरू झाल्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान, तब्बल शाहरुख चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर येत आहे, पण बायकॉट ट्रेंडनंतर या चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामुळे चित्रपटाला विरोध होत आहे. 

Web Title: Bajrang Dal's opposition to 'Pathan', protests by breaking into theaters in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.