विठ्ठल-रुख्मिणीच्या वेशात बालदिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:57 AM2019-07-19T11:57:12+5:302019-07-19T11:57:39+5:30
दिंडीत सहभागी झालेले आॅल इन वन प्रिस्कूलचे विद्यार्थी.
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपूरातील आॅल इन वन प्रिस्कुल अँड डेकेअर मधील विद्यार्थ्यांतर्फे आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
नर्सरी, ज्युनियर व सिनियरच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने ह्या बालदिंडीत वारकरी, विठ्ठल, रुख्मिणीच्या वेशभूषेत येऊन सहभाग घेतला. बालदिंडी ही ट्रॅक्टरवरून फिरवण्यात आली. शाळेच्या परिसरातील विठ्ठल-रुख्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या दिंडीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. शाळेची संपूर्ण टीम अश्विनी नाबरिया, वैशाली साळुंके, पूनम पाटील, शिपाई पुष्पा पाटील, सचिव ज्ञानेश्वर पाटील, उपमुख्याध्यापिका सुवर्णा पाटील आणि मुख्याध्यापक विशाल पाटील ह्या सर्वांच्या मेहनतीत ही बालदिंडी अतिशय उत्साहात पार पडली.