बाम्हणे सील, धुळ्यात ड्रोन ठेवणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:46 PM2020-04-22T22:46:38+5:302020-04-22T22:49:01+5:30

धुळे/दोंडाईचा/कापडणे : शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे ७० वर्षीय महिला कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आल्याचा पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा भाग म्हणून बाम्हणे ...

Bamhane seal, the drone will keep an eye on Dhule | बाम्हणे सील, धुळ्यात ड्रोन ठेवणार नजर

dhule

googlenewsNext

धुळे/दोंडाईचा/कापडणे : शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे ७० वर्षीय महिला कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आल्याचा पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा भाग म्हणून बाम्हणे केंद्रबिंदू मानून त्यास कन्टेन्मेट एरिया जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार 3 किमी पर्यंत सील करण्यात आले असून बाम्हणेस लागून असलेले 5 किलोमीटर परिघातील क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.या क्षेत्रातील बाम्हणे गावासह पाच गावात पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली़
बाम्हणे येथील ७० वर्षीय महिला कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली आहे. या घटनेनंतर बाम्हणेसह परिसरातील सर्वच गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बाम्हणे केंद्रबिंदू घोषित करून ३ किलोमीटर अंतरावरील बाम्हणेसह धमाणे, लंघाणे कन्टेन्मेट क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तर ५ किलोमीटर क्षेत्रातील भाग बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. बफर झोन मध्ये जुने कोळदे, कुरुकवाडे या गावाचा समावेश आहे. या क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी असून या क्षेत्रात प्रवेश करणे-बाहेर जाणे यास संपूर्ण बंदी आहे. या क्षेत्रातील सर्व घराचे सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी यांचा देखरेख खाली होत आहे. सर्व नियुक्त क्षेत्रीय अधिकारी घरांना भेट देऊन अहवाल नोडल अधिकाऱ्यांना पाठविणार आहेत. वैद्यकीय पथक संशयास्पद रुग्णाचे दैनंदीन परीक्षण करणार आहेत. या कामी १४ तपासणी पथक कार्यरत करण्यात आले आहे. प्रत्येक पथकात एक आरोग्य अधिकारी, शिक्षक व होमगार्ड यांची नेमणूक केली आहे. टीमला मदत म्हणून तलाठी आर.डी.पवार व कोतवाल असतील. बाम्हणे गावात तात्काळ जंतुनाशक फवारणीस सुरुवात करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री प्रांताधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अपर तहसीलदार सुदाम महाजन, पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड आदींनी बाम्हणे गावास भेट दिली.
उपजिल्हा रुग्णालयातील ११ कर्मचारी क्वारंटाईन
सदर महिलेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करतांना संपर्कात आलेल्या ११ कर्मचाऱ्यांना रोटरी स्कुलमध्ये स्थापन क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ललीतकुमार चंद्रे यांनी दिली.
याशिवाय महिेलेच्या घरातील पाच जणांना वैद्यकीय तपासणी करिता हिरे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅबचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूनंतर प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे़ त्यापार्श्वभुमीवर तिरंगा चौकासह प्रशासनाकडून प्रतिबंधीत केलेल्या परिसरात आता ड्रॉन कॅमेºयाची नजर राहणार आहे़ याकरीता दोन ड्रोन कॅमेºयांची मदत घेण्यात येणार आहे़ बुधवारी ड्रोन कॅमेºयांची मदतीने आझाद नगर पोलिस ठाण्याच्या छतावरून पतिबंधीत क्षेत्रात टेहळणी करण्यात आली़ यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपअधीक्षक सचिन हिरे, दिनेश आहेर उपस्थित होते़ दरम्यान दुपारी ३ वाजता कॅमेºयांची पाहणी करण्यात आली़ कॅमेºयांत आधाराव बाहेर फिरणारे व नियम तोडणाºयावर कठोर कारवाई केली जाणाा आहे़
कापडणे गाव लॉकडाऊनचा ठेवण्याचा निर्णय
जिल्ह्यात कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर धुळे तालु्क्यातील कापडणे गाव येथे २२ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून ते २४ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण 'लॉकडाऊन' करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अचानक मोठ्या संख्येने कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन येथे संपूर्ण संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. परस्पर संपकार्मुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेवून ग्रामस्थाच्यावतीने संपूर्ण संचारबंदी जाहीर केली आहे़ यावेळी सरपंच प्रतिनिधी प्रमोद पाटील, नवल पाटील, अमोल पाटील, धनराज पाटील, बापु महाराज, नरेंद्र पाटील, जगन्नाथ पाटील, दिपक पाटील, विठोबा माळी, ललित बोरसे, ज्ञानेश्वर बोरसे, चंदु पाटील, प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अमोल पाटील, महेश पाटील आदी उपस्थित होते.
अन्यथा होईल कारवाई
यात कोणत्याही व्यक्तीला रस्त्यांवर, सार्वजनिक चौकात, गल्लीत, संचार करणे वा वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे, कोणतीही वस्तू विकणे या सर्व गोष्टी करता येणार नाहीत. यात केवळ वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने, दूध व रेशन दुकान ही वगळता सर्व दुकाने बंद राहतील.

 

Web Title: Bamhane seal, the drone will keep an eye on Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे