पुनर्तपासणीत ‘मलांजन’ ठरले अव्वल!
By admin | Published: June 6, 2017 12:06 PM2017-06-06T12:06:47+5:302017-06-06T12:06:47+5:30
स्मार्ट ग्राम योजना : साक्रीची बाजी, धुळे तालुक्यातील मळाणे गुणांनुक्रमे पिछाडीवर
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.6 - राज्याच्या स्मार्ट ग्राम योजनेत सर्व निकष पूर्ण केल्याचा दावा जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी केल्यामुळे ही योजना आणि बक्षिसपात्र ग्रामपंचायती वादातीत ठरल्या होत्या़ पालकमंत्री दादा भुसे यांच्या आदेशानंतर समितीने पुनर्तपासणी केली़ त्यात पुन्हा साक्री तालुक्यातील मलांजन ग्रामपंचायत अव्वल ठरली आहे, अशी माहिती समितीप्रमुख तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अजरुन गुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यात तालुकानिहाय पारितोषिक 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी जाहीर झाले आहेत़ त्यानंतर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी धुळे आणि साक्री तालुक्यात हा पुरस्कार विभागून देण्यात येणार असल्याची माहिती तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिली होती़ या पुरस्कारात धुळे तालुक्यात मळाणे, साक्री तालुक्यात मलांजन, शिंदखेडा तालुक्यात नवे कोडदे आणि शिरपूर तालुक्यात उपरपिंड या चार ग्रामपंचायतींना पुरस्कार पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार होता़ पण, जिल्हास्तरीय पुरस्कारात धुळे तालुक्यातील मळाणे आणि साक्री तालुक्यातील मलांजन या ग्रामपंचायतींमध्ये चुरस निर्माण झाली होती़ समितीकडून पाहणी केल्यानंतर सारखे गुण येत असल्यामुळे हा पुरस्कार विभागून देण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता़ साक्री आणि धुळे तालुका यानिमित्ताने आमने-सामने आला होता़
जिल्ह्यातील मलांजन आणि मळाणे ग्रामपंचायतीत स्मार्ट ग्राम योजनेच्या पारितोषिकावरून उद्भवलेल्या वादानंतर 19 मे 2017 रोजी समितीतील अधिका:यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली़ पालकमंत्री दादा भुसे यांच्या आदेशामुळे पाहणी दौरा अधिका:यांनी केला़