मनपाने २५ व्यापाºयांचे बँंक खाते गोठविले!

By admin | Published: July 14, 2017 01:12 AM2017-07-14T01:12:47+5:302017-07-14T01:12:47+5:30

एलबीटीची कारवाई : विवरणपत्र सादर न करणे पडणार महागात

Bank accounts of 25 traders frozen! | मनपाने २५ व्यापाºयांचे बँंक खाते गोठविले!

मनपाने २५ व्यापाºयांचे बँंक खाते गोठविले!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेने वारंवार नोटिसा देऊनही विवरणपत्रे सादर न करणाºया २५ व्यापाºयांचे बँक खाते मनपाकडून गोठविण्यात आले आहेत़ संबंधित व्यापारी जोपर्यंत विवरणपत्रे सादर करीत नाही, तोपर्यंत खाते ‘सील’ राहणार आहे़
शासनाच्या आदेशाने मनपाने ६ जुलै २०१३ ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत व्यावसायिकांना एलबीटी लागू केला होता़ मात्र या कालावधीत झालेल्या व्यवहारांची विवरणपत्रे काही व्यापाºयांनी अजूनही सादर केलेली नाहीत़ तर काही व्यापाºयांनी तीन वर्षांपैकी केवळ एक किंवा दोन वर्षाचीच विवरणपत्रे सादर केली आहेत़ त्यामुळे मनपाच्या तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे यांच्या आदेशाने विवरणपत्र सादर न करणाºया व्यापाºयांना नियमानुसार पाच हजार रुपये दंड आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, एप्रिल महिन्यात व्यापाºयांना एलबीटी विभागाने नोटिसा बजावल्या होत्या़ त्यानंतर काही व्यापाºयांनी विवरणपत्रे सादर केली असली तरी बºयाच व्यापाºयांनी अजूनही विवरणपत्रे सादर केलेली नाहीत़ त्यामुळे संंबंधित व्यापाºयांना पाच हजार रुपये दंड आकारणी होणार आहे़ पण तरीही संबंधित व्यापारी दुर्लक्ष करीत असल्याने एलबीटी विभागाने कारवाई सुरू केली आहे़
आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार एलबीटी विवरणपत्रांची तपासणी वेगाने करण्याचे आदेश तपासणी यंत्रणेला देण्यात आले असून विवरणपत्रे सादर न केलेल्या अन्य व्यापाºयांना नोटिसा बजावण्यात येत आहेत़
एलबीटी विभागाला असलेल्या अधिकारात खाते गोठविण्याची कारवाई करण्यात आली असून उर्वरित व्यापाºयांनी लवकरात लवकर विवरणपत्रे सादर न केल्यास त्यांचीही खाती गोठविण्यात येणार           आहेत़
२०१३-१४ मध्ये ३ हजार ८६२ व्यापाºयांनी एलबीटी विवरणपत्र जमा केले असून १०५० व्यापाºयांनी जमा केलेले नाही, २०१४-१५ मध्ये ३ हजार ६९८ व्यापाºयांनी विवरणपत्रे सादर केली असून, १ हजार २१४ व्यापाºयांनी विवरणपत्रे सादर केलेली नाहीत़ तर २०१५-१६ मध्ये २ हजार ९०१ व्यापाºयांनी विवरणपत्रे सादर केली असून २०११ व्यापाºयांनी विवरणपत्रे सादर केलेली नाही़

Web Title: Bank accounts of 25 traders frozen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.