बापूदादा शार्दुल काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:54 PM2019-04-17T14:54:25+5:302019-04-17T14:55:17+5:30
अंत्ययात्रेत अनेकांनी उपस्थिती देवून श्रध्दांजली अर्पण
धुळे : शिवसेनेची धुळ्यात स्थापना करुन हिंदुत्वाचा कडवा पुरस्कार करणारे निष्ठावान बापूदादा उर्फ देविदास सिताराम शार्दुल (८३) यांचे उपचारादरम्यान मुंबईत निधन झाले़ त्यांच्या अंत्ययात्रेत अनेकांनी उपस्थिती देवून श्रध्दांजली अर्पण केली़
हिंदुत्वाचा पुरस्कार करीत १९६६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेची स्थापना केली़ बाळासाहेबांच्या उत्स्फूर्त भाषण शैलीने त्या काळी अनेकांना भुरळ घातली़ धुळ्यातील बापूदादा शार्दुल याच भाषणामुळे बाळासाहेबांचे चाहते बनले़ परिणामी ते शिवसेनेकडे ओढले गेले़ स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेतानाच बापुदादांनी १९६७ साली धुळ्यात शिवसेनेची स्थापना केली़ मालेगाव रोडवरील शार्दुल गॅरेजच्या जागेवर असलेल्या पत्र्याच्या घरात वास्तव्य करणारे बापूदादा हे मनोहर टॉकिजसमोर एका छोट्याशा जागेत कायम बसलेले असायचे़ तेथून त्यांनी शिवसेनेचा सर्व कारभार पाहीला़ मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली़ त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ मंगळवारी सायंकाळी राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली़