लॉकडाउनमध्ये ‘शिवभोजन’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 08:32 PM2020-05-17T20:32:49+5:302020-05-17T20:33:11+5:30

जिल्ह्यात १५ केंद्र कार्यान्वीत : आतापर्यंत ७५ हजारांपेक्षा अधिक गरजूंनी घेतला लाभ

The basis of 'Shiva Bhojan' in lockdown | लॉकडाउनमध्ये ‘शिवभोजन’चा आधार

लॉकडाउनमध्ये ‘शिवभोजन’चा आधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लॉकडाऊनच्या कालावधीत हजारो अनाथ, निराधार, हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कुटूंबांसाठी शिवभोजन मोठा आधार ठरत आहे. जिल्ह्यातील पंधरा शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत ७४ हजारापेक्षा अधिक गरजूंनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली़
धुळे जिल्ह्यात २६ जानेवारीपासून शिवभोजन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सुरवातीला धुळे शहरात शिवभोजन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने साक्री, शिंदखेडा, पिंपळनेर, शिरपूर, दोंडाईचा, ता. शिंदखेडा आदी ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले. सुरवातीला ग्राहकाकडून दहा रुपये घेतले जात असत. त्यानंतर ३० मार्चपासून ग्राहकांकडून पाच रुपये घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले. कृषी उत्पन्न बाजार समिती, सर्वोपचार रुग्णालय, बसस्थानक परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी ही केंद्रे सुरु आहेत.
सकाळी ११ ते तीन या कालावधीत सुरु राहणाºया या केंद्रातील भोजनात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात, एक वाटी वरण समाविष्ट आहे. ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या रक्कमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम भोजनालय मालकास अनुदान म्हणून शासनामार्फत देण्यात येते. या भोजन केंद्रामध्ये किमान ५० ते कमाल दोनशे थाळींची सुविधा उपलब्ध आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना सुरु आहे तेथील आस्थापनेवरील कर्मचाºयांना या भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास मनाई करण्यात आली आहे.
शिव भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी करुन घेतली जाते. याबाबतची जबाबदारी संबंधित भोजन केंद्र चालकावर सोपविण्यात आलेली आहे. सध्या लॉकडाउनचा कालावधी सुरु आहे. या कालावधीत अवघ्या पाच रुपयात भोजन उपलब्ध होत असल्याने अनाथ, निराधार व्यक्तींसाठी शिवभोजन केंद्र खºया अर्थाने आधार ठरत आहेत.
लॉकडाउनमुळे रोजगार बंद झाल्याने हातावर पोट असणाºयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यांची भोजनाची सोय या केंद्रांवर होत आहे़ शिवाय निराधार आणि भिक्षा मागणाºयांची समस्या गंभीर होती़ कोरोनाच्या संसर्गाला घाबरुन या निराधारांना अन्न मिळत नव्हते़ परंतु कुणी दिलेल्या पाच रुपयांमध्ये त्यांना याठिकाणी भोजन उपलब्ध होत आहे़

Web Title: The basis of 'Shiva Bhojan' in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे