कोरोनाच्या लढाईत एन.सी.सी. कॅडेट मदतीला धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:12 PM2020-05-08T22:12:57+5:302020-05-08T22:13:32+5:30
छात्र सैनिकांना आॅनलाईन प्रशिक्षण : विविध गावांमध्ये जनजागृती; नियम पालनाची करित आहेत सक्ती
धुळे : कोरोना या आजाराला हरविण्यासाठी डॉक्टर, पोलीस सर्व जीवावर उदार होऊन लढत आहेत. या लढाईत आपणही खारीचा वाटा उचलावा म्हणून एन.सी.सी. कॅडेटस् मदतीला धावले आहेत. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत आणि कंमांडींग आॅफिसर कर्नल राजिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील विविध संस्थांमधील छात्रसैनिकांची नियुक्ती केली आहे.
४८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.चे कंमांडीग आॅफीसर कर्नल राजिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या छात्र सैनिकांनी दीक्षा अॅपच्या माध्यमातून कोरोना पासून बचाव करण्यासाठी आॅनलाईन प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत व कर्नल राजिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली छात्र सैनिकांची गावांमध्ये नियुक्ती केली आहे.
तिसगाव ढंडाणे
तिसगाव - धुळे येथील व्ही.एस.डब्ल्यू. कॉलेज व एस. एस.व्ही.पी एस. सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेले लेफ्टनंट प्रा.सुनील पाटील व त्यांची टीम बाभुळवाडी येथील तीन छात्र सैनिक मदतीला आले आहेत. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावातील सरपंच किरण पवार, उपसरपंच भागीरथा पिंताबर पाटील, पोलीस पाटील रमेश पाटील व पं. स. सदस्य लक्ष्मण पितांबर पाटिल या ग्रामस्थांनी उपाय योजना केलेलीच आहे त्यात छात्र सैनिकांची भर पडली आहे.
हे छात्र सैनिक गावातील, किराणा दुकान, रेशन दुकान इ. ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना सोसिएल डिस्टनसिंगचे पालन करण्याच्या सूचना देतात, गर्दी नियंत्रित करणे नागरिकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करणे, मास्क लावण्यास सांगणे, सॅनिटाईझर वापरण्यास सांगणे, हाथ स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगणे, तसेच गावात विनाकारण घराबाहेर पडणाºया, चौकात बसलेल्या नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करीत आहेत. या कामात गावातील सरपंच किरण पवार उपसरपंच भागीरथाबाई पिंताबर पाटील, पोलीस पाटील रमेश पाटील , सर्व सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थ छात्र सैनिकांना सहकार्य करीत आहे. बाभुळवाडी गावातील पं.स. सदस्य लक्ष्मण पाटील यांनी छात्र सैनिकांना मास्क वाटप केल तर राज कुमार व सतपाल यांनी सॅनीटायजर वाटप केले.
आनंदखेड्यात छात्र सैनिक
धमाणे - धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे एस. एस.व्ही.पी.एस. आर्टस् महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले चार छात्र सैनिक मदतीला आले आहेत. गावात कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी उपाय योजना केलेली आहे. त्यात एन.एन.सी. छात्र सैनिकांची भर पडली आहे.
हे छात्र सैनिक गावातील स्टेट बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, किराणा दुकान, रेशन दुकान इत्यादी ठिकाणी येणाºया नागरिकांना सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याचे सूचना देतात. गर्दी नियंत्रित करणे, नागरिकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करणे, मास्क लावण्यास सांगणे, सॅनिटाईझर वापरण्यास सांगणे, हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगणे, तसेच गावात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना चौकात बसलेल्या नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करीत आहेत. या कामात सरपंच कविता देवेंद्र भामरे, उपसरपंच मंगा मोरे, पोलीस पाटील तनुजा किरण गवते, देवेंद्र भामरे, ग्रामपंचातयचे सर्व सदस्य व ग्रामस्थ छात्र सैनिकांना सहकार्य करीत आहे.
छात्र सेनेची भरीव कामगिरी
विंचूर - राष्ट्रीय छात्र सेनाने एकता व शिस्तीचे पालन करित तालुक्यात कोरोनाच्या लढ्यात भरीव कामगिरी करत नागरिकांना सुरक्षेसाठी शिस्त आणण्यासाठी पोलिसांच्या कामात मदतीचा हात दिला आहे. एनसीसी धुळे येथील कॅडेटस ग्रामीण भागात वडजाई, बाबुळवाडी, खेडे, नगाव तसेच देवपूर व धुळे शहर आदी ठिकाणी गावात बाजारपेठ, बँक, रेशन दुकान याठिकाणी कोरोनाबद्दल जनजागृती व लोकांना शिस्त लावण्याचे कार्य केले. यात कॅप्टन के.एम. बोरसे, लेफ्ट. खलाणे, लेफ्ट. एस.ए. पाटील, एन.बी. बच्छाव, एन.व्ही. नागरे, पी.यू. पवार, मिलिंद अहिरे, अल्तमाशखान, हवलदार राजकुमार, हवलदार सतपाल, हवलदार गावडे यांच्या नियंत्रणाखाली कॅडेट्सचे कौतुकास्पद काम सुरू आहे.