काळजी घ्या, अपघात थांबतील!
By admin | Published: January 9, 2017 11:50 PM2017-01-09T23:50:03+5:302017-01-09T23:50:03+5:30
जिल्हाधिकारी : रस्ता सुरक्षा अभियानाच्या शुभारंभप्रसंगी प्रतिपादन, माहिती पत्रकांचेही अनावरण
धुळे : रस्त्यावरचे अपघात कधी घडतील, याची शाश्वती देता येत नाही़ अपघात कमी करण्याची जबाबदारी केवळ एका विभागाची नसून ती सर्वाची आह़े नागरिकांनी एकमेकांचा सन्मान केला, वाहन चालविताना काळजी घेतली तर वाहतुकीला शिस्त लागू शकत़े पर्यायाने अपघात होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केली़
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे शहर पोलीस, धुळे ग्रामीण पोलीस, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला़ त्या वेळी ते बोलत होत़े या प्रसंगी पोलीस अधीक्षक चैतन्या एस़, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय लांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधाकर मोरे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, आशिष पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होत़े
जिल्हाधिकारी म्हणाले, पाश्चात्य देशात वाहतुकीला शिस्त आह़े ही शिस्त तेथील नागरिकांनी लावून घेतली़ आपणही वाहतुकीचे नियम समजून घेत शिस्त लावून घेतली पाहीज़े सिगAल न तोडणे, पादचा:यास प्रथम प्राधान्य देण्यासाठी प्रत्येक वाहनधारकांनी प्रयत्न करणे आवश्यक आह़े शालेय जीवनापासून विद्याथ्र्याना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली पाहिज़े वाहतुकीच्या नियमांचा अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे, असे झाल्यास वाहतुकीला एक शिस्त लागेल, पर्यायाने अपघातात निश्चित घट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ रस्त्यावर वाहन चालविताना निष्काळजीपणा दाखविला तर तो स्वत:च्या जीवाबरोबरच दुस:याच्या जीवावर बेतू शकतो, असेही जिल्हाधिका:यांनी सांगितल़े
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य मिळाले पाहीज़े वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे, असे पोलीस अधीक्षक चैतन्या एस़ यांनी सांगितल़े तर दुचाकी वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नय़े मोटारसायकलने प्रवास करताना हेल्मेट घालावे, असे सांगत आगामी काळात शाळांमध्ये वाहतूक नियमांची माहिती देऊ, असे सुधाकर मोरे म्हणाले. वाहनांची तपासणी मोहीमही राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करत वाहन चालविताना काळजी घेण्याचे आवाहन केल़े कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश राऊत यांनी केल़े आभार हिंमत जाधव यांनी मानल़े
रस्ता सुरक्षाविषयक माहिती देणा:या विविध पत्रकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल़े तसेच गेल्या वर्षी रस्ता अपघातातून चौघा विद्याथ्र्याची सुखरूप सुटका करणारे शिक्षक जी़ क़े ठोंबरे यांचाही सत्कार करण्यात आला़ याप्रसंगी परिवहन महामंडळ, पोलीस विभागासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े विभागासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े