भुईमूग पिकाच्या काढणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2017 05:13 PM2017-04-30T17:13:23+5:302017-04-30T17:13:23+5:30
मालपूर परिसर : मेहनतीचे काम; मजुरीही जास्त; शेतकरी त्रस्त
मालपूर, जि.धुळे, दि.30- शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे भुईमूग पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. भूईमूग काढणीसाठी मजुरीदेखील शेतक:यांना जास्तीची द्यावी लागत असल्याने येथील शेतकरी त्रस्त आहे.
भुईमूग (शेंगा) हे खरिप व रब्बी दोन्ही हंगामातील पीक असून रब्बीत या पिकाची डिसेंबर अखेर पेरणी केली जाते. चार महिन्याचे जास्त पाण्याचे हे पीक असून येथील कलवाडे, मोयाने, तेले, कोठूम, भुसारे आदी शिवारात हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. परंतु, सद्य:स्थितीत पाण्याचे अल्प प्रमाण सर्वात जास्त मेहनत व पीक काढणीसाठी लागणारी मोठी मजुरी यामुळे हे पीक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.
रणरणत्या उन्हात दिवसभर या परिसरातील शेतकरी या पिकाचा माल तयार करण्याचे काम करत आहे. त्यामुळे मजुरीचे दरही वाढले असून भुईमूग पीक काढण्याचे आधुनिक यंत्र अद्याप येथील परिसरात दाखल नसल्यामुळे संपूर्ण काम मजुरांच्या साह्यानेच करावे लागत आहे. भुईमूगाची काढणीला जास्त मेहनत लागत असताना बाजारपेठेत शेतक:यांना अपेक्षित असलेला भाव मिळत नसल्यामुळे शेतक:यांपुढे पेच निर्माण झाला आहे.
परंतु, मृग नक्षत्रात पेरणीच्या वेळेस बैलांना चारा म्हणून या पिकाचा पाला सर्वाेत्तम असल्यामुळे आजही येथील काही शेतक:यांना थोडय़ा प्रमाणात का होईना? या पिकाचा पेरा करावा लागत आहे.
यावर्षी रब्बीतील ओल्या भुईमूग शेंगाना 2500 ते 3 हजार तर कोरडय़ा शेंगाना चार ते पाच हजार प्रतिक्विंटल भाव असल्याची माहिती शेतक:यांनी दिली आहे.