धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:44 PM2018-01-12T12:44:33+5:302018-01-12T12:45:22+5:30

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : भगवामय वातावरण, महिलाही सहभागी

The beginning of the Maratha Kranti Morcha in Dhule | धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात

धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात

Next
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादनानंतर मोर्चाला सुरुवातमोर्चाच्या मार्गासह शहरात भगवामय वातावरणसुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  :  अपप्रवृत्तीच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चातर्फे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास महामोर्चाला सुरुवात करण्यात आली़ मोर्चात सर्वत्र भगवामय वातावरण निर्माण झाले आहे़ यात महिलाही उत्स्फुर्तपणे सहभागी झालेल्या आहेत़ पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे़  
महामोर्चाचा असा मार्ग
शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मोर्चाला प्रारंभ झाला़ हा मोर्चा आग्रा रोड मार्गे कराचीवाला खुंटाकडून महापालिका आणि पुढे झाशी राणी पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे़ पदाधिकाºयांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करणार आहे़  
पोलीस बंदोबस्त तैनात
शहरात निघणारा मोर्चा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे़ या बंदोबस्तात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, २ पुरुष आरसीपी तुकडी, १ महिला आरसीपी तुकडी, ८ पोलीस निरीक्षक, ३२ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, ४१५ पोलीस कर्मचारी, ६० महिला पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ ची १ कंपनी (त्यात १२० जवान) असणार आहे़ याशिवाय नंदुरबार, जळगाव आणि नाशिक ग्रामीण येथून प्रत्येकी १ अधिकारी २० कर्मचारी असलेली आरसीपी तुकडी तैनात करण्यात आलेली आहे़ 

Web Title: The beginning of the Maratha Kranti Morcha in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.