कुटुंबासह समाजाचे ‘ज्येष्ठ’ उत्तम आधारस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:18 PM2019-01-09T22:18:25+5:302019-01-09T22:18:38+5:30
नरेशकुमार बहिरम : ज्येष्ठांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : ज्येष्ठ नागरिकांनी मोहात पडू नये. जीवन संघर्षमय आहे भविष्याचा विचार करा. उद्या आपल्याला ज्येष्ठत्वाला सामोरे जायचे आहे तेव्हाचे चित्र डोळ्यासमोर आणा. हाती आलेली संधी व संपत्ती गमावू नका. तुमच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील प्रत्येकाच्या पंखात बळ येते. तुम्ही कुटुंबासाठी व समाजासाठी उत्तम आधारस्तंभ आहात, असे प्रतिपादन पिंपळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात दीपस्तंभ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, तालुका वैद्यकीयअधिकारी डॉ.अनुराधा लोया, डॉ.जितेश चौरे, डॉ.शिरोडे, ज्येष्ठ नागरिक संघांचे सचिव शशिकांत भदाणे, के.डी. कोठावदे, सेवानीवृत्त प्राचार्य एस.वाय. गवळे, ए.पी. दशपुते, आर.एस. जोशी, रेडीओ पांझराच्या प्रतिनिधी मनीषा मरसाळे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला अध्यक्ष विमलबाई दशपुते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ए.एस. बिरारीस यांनी तर सूत्रसंचालन समुपदेशक प्रा.एस.डी. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड म्हणाले की, म्हातारपण म्हणजे चहू दिशांचा अंधकार असतो.
ज्याला आपले दु:ख सांगावे ते आपले ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. वय वाढण हा निसर्गक्रम आहे. म्हणून ज्येष्ठांनी स्वत:ला अपराधी समजू नये. अशावेळी आपल्याला भक्कमपणे आधार देण्यासाठी पोलीस खाते सदैव तत्पर राहील.
या वेळी डॉ.शिरोडे, के.डी. कोठावदे व शशिकांत भदाणे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची गरज काय यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए.बी. मराठे, विजय सोनवणे, भालचंद्र कोठावदे, दाशरथ मराठे, व्ही.एन. जीरेपाटील व ज्येष्ठनागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुभाष जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.