बेटावदच्या शेतक:याला 42 हजारात गंडा
By admin | Published: May 7, 2017 01:49 PM2017-05-07T13:49:11+5:302017-05-07T13:49:11+5:30
बँक प्रतिनिधी बोलत असल्याची बतावणी करून एटीएमचा क्रमांक मिळवून बेटावद येथील शेतक:याच्या बँक खात्यातून परस्पर 42 हजार रूपये काढून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आह़े
Next
>धुळे,दि.7- भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन बँक प्रतिनिधी बोलत असल्याची बतावणी करून एटीएमचा क्रमांक मिळवून बेटावद (ता़ शिंदखेडा) येथील शेतक:याच्या बँक खात्यातून परस्पर 42 हजार रूपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी नरडाणा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
बेटावद येथे राहणारे शेतकरी अतुल श्रावण भोई यांना गेल्या सोमवारी दुपारी 1़30 वाजेच्या सुमारास त्यांच्या भ्रमणध्वनीवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला़ त्याने तुमच्या एटीएमची मुदत संपलेली आहे, ते नवीन बनविण्यासाठी तुमचे कार्ड नंबर द्या असे त्यांना सांगितल़े तेव्हा भोई यांनी तुम्ही कोण बोलत आहेत अशी विचारणा केली़ त्यानंतर समोरच्या व्यक्तीने मै बँक का प्रतिनिधी, राहूल शर्मा बोल रहा हू अशी बतावणी करून भोई यांच्याकडून त्यांच्या बँक खाते, एटीएम क्रमांक व गोपनिय पीन नंबरची माहिती विचारून घेतली़ त्यानंतर त्यांच्या बेटावद येथील स्टेंट बँक शाखेच्या खात्यातून त्याच दिवशी दुपारी 1़30 ते तीन वाजेदरम्यान परस्पर पाच वेळा एकुण 42 हजार रूपये काढून घेतल़े