दुर्मीळ घटनेचे साक्षीदार होण्याचे साऱ्यांनाच वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 10:12 PM2019-12-25T22:12:04+5:302019-12-25T22:12:36+5:30
कंकणाकृती सूर्यग्रहण : खगोलीय घटनेचा नयनरम्य अविष्कार
धुळे : त्रिखंडातील दुर्मीळ घटना म्हणून पाहिल्या जाणाºया सूर्यग्रहणाचे आता साऱ्यांनाच वेध लागले आहेत. हे ग्रहण संपूर्ण भारतातून विविध प्रकारे दिसणार आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात हे कंकणाकृती तर महाराष्टÑातून हे खंडग्रास स्वरुपात दिसणार आहे.त्यामुळे या ग्रहणाबाबत प्रत्येकालाच कुतुहल आहे.
अवकाशातील अद्भूत घटना पाहण्यासाठी खगोलप्रेमींच नव्हे तर साºयांचीच उत्सुकता असते. त्यामुळे २६ डिसेंबर रोजी होणाºया खंडग्रास सूर्यग्रहणाकडेही साºयांचे डोळे लागले आहेत. यापूर्वी १९९५, १९९९ व २००९ मध्ये खग्रास सूर्यग्रहण, २०१० मध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण झाले होते.
ही एक वैज्ञानिक व शैक्षणिक घटनाही असल्यामुळे पालकांनी मुलांसह योग्य साधने वापरुन सुरक्षित पद्धतीने हे ग्रहण अवश्य पहावे. यातून मुलांच्या विचारांचा, ज्ञानाचा आवाका वाढेल व अंतराळाशी सर्वांचे नाते जडेल. आयुष्यात मोजक्याच वेळा सुर्यग्रहण पाहण्याची संधी येते. त्यामुळे खगोलीय विज्ञानाचा हा नयनरम्य अविष्कार पाहण्याची संधी दवडू नये, असे आवाहन खगोलप्रेमींनी केले आहे.
४मार्गशिर्ष कृ. ३० अमावस्या दि.२६ डिसेंबर रोजी भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, इथिओपिया आणि आॅस्ट्रेलियात उत्तरेकडील प्रदेशात ग्रहण दिसणार आहे. सकाळी ८.०४ वाजता स्पर्श, मध्य ९.२२, मोक्ष १०.५५, सर्वकाळ २.५१, पुण्यकाळ ग्रहणस्पर्श ते मोक्षापर्यंत. ग्रहणाचे वेध २५ डिसेंबर सुर्यास्तापासून. रात्री १२ वाजल्यापासून मोक्षापर्यंत वेध पाळावे.
४ग्रहण स्पर्श ८.०४ ते मोक्ष १०.५५ पर्यंत पाणी पिणे, नाश्ता, भोजन करु नये. कारण हवा ही अशुद्ध असते. स्नान, जप, नित्यकर्म, तर्पणकर्म करावी.
४ग्रहण राशीचे फळप्राप्ती- कर्क, तुला, कुंभ, मीन राशीला- शुभ, मेष, मिथुन, सिंह राशीला- मिश्रफळ, वृषभ, कन्या, धनु, मकर राशीला- अनिष्ठ फळ आहे.
२६ डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल. बहुतांश भागातून ते खंडग्रास स्वरुपास पहावयास मिळेल तर दक्षिण भारतातील तिरप्पुर, कोर्इंबतूर, मंगलोर, त्रिची (तिरुचेरापल्ली) येथून कंकणाकृती स्वरुपात दिसेल. दक्षिण भारतातून सूर्य सुमारे ९३ टक्के झाकोळला जाईल तर मध्य भारतातून ६५ टक्के झाकोळला जाईल. ग्रहण स्पर्श ८ वाजून ६ मिनिटे आणि ४० सेकंदांनी सुरु होईल तर ग्रहण मध्य ९ वाजून २४ मिनिटे आणि ४१ सेकंदांनी होईल. ग्रहण अस्त सकाळी १० वाजून ५८ मिनिटे आणि २० सेकंदांनी होईल. सदर खंडग्रास सूर्यग्रहण २ तास ५१ मिनिटे टिकेल. सदर सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी योग्य सौर चष्म्याचा वापर करुन पहाता येऊ शकते. यावर्षी हे शेवटचे सूर्यग्रहण असून पुढीलवर्षी २१ जून २०२० रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण धुळ्यातून खंडग्रास स्वरुपात दिसेल. अमॅच्युर एॅस्ट्रॉनॉमि क्लबतर्फे सूर्यग्रहण टेलिस्कोपद्वारे दाखविण्यात येणार असून सर्वांसाठी ते नि:शुल्क आहे. अधिक माहितीसाठी रत्नेश पंडीत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेअ आहे.