भरधाव रिक्षा उलटली, महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 10:43 PM2019-12-08T22:43:35+5:302019-12-08T22:43:55+5:30

नवे भदाणे शिवार : घोडदे येथील सहा प्रवासीही जखमी, वाहतूक विस्कळीत

Bhadhava rickshaw reversed, woman killed | भरधाव रिक्षा उलटली, महिला ठार

भरधाव रिक्षा उलटली, महिला ठार

Next

धुळे : समोरुन येणाऱ्या वाहनांने कट मारल्याने साक्रीकडे भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जाणारी अ‍ॅपेरिक्षा नवे भदाणे गावाजवळ उलटली़ यात महिला ठार तर ६ प्रवासी जखमी झाले़ अपघाताची ही घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ यावेळी काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़
सुरत-नागपुर महामार्गावर नेहमीच अपघात होत आहे. ही बाब दुर्देवी आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एमएच १८ टी १६८१ क्रमांकाची अ‍ॅपे रिक्षा प्रवाश्यांना घेऊन धुळ्याहुन साक्रीच्या दिशेने निघाली़ या अ‍ॅपेरिक्षात अकरा जण प्रवास करत होते. अक्कलपाडा गावाजवळील वळण रस्त्यावर समोरुन येणाºया वाहनाने कट मारल्याने भरधाव वेगात असलेल्या रिक्षा चालकाचा रिक्षेवरील ताबा सुटला़ परिणामी रिक्षा रस्त्यावर उलटली़ यात रिक्षेतील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. याच रिक्षेत पाठिमागील सिटवर बसलेली सुशीलाबाई शंकर नंदन (४५, रा़ घोडदे ता़ साक्री) ही महिला रस्त्यावर फेकली गेली़ तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती रक्तबंबाळ झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला़ रिक्षात बसलेले अन्य प्रवासी या अपघातात जखमी झाले. त्यांना तातडीने नागरीकांच्या मदतीने उपचारार्थ ग्रामिण कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले़
वाहतूक विस्कळीत
महामार्गावर या अपघातामुळे जवळपास अर्धातास वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी गर्दी केली होती़ अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले़
दरम्यान, साक्री तालुक्यातील घोडदे येथील प्रवासी जखमी झाले आहेत़ त्यात, शंकर देवराव नंदन, सरुबाई मालजी नंदन, सुमन तुकाराम नंदन, तुकाराम लक्ष्मण नंदन, मंदाकिनी अनिल नंदन, भिकूबाई नामदेव नंदन यांचा समावेश आहे़ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़

Web Title: Bhadhava rickshaw reversed, woman killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.