हिंदू धर्माच्या प्रसारासाठी परदेशात भागवत कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:24 PM2019-08-18T12:24:56+5:302019-08-18T12:27:24+5:30

भागवताचार्य राजीवकृष्णजी महाराज

Bhagwat stories abroad for the spread of Hinduism | हिंदू धर्माच्या प्रसारासाठी परदेशात भागवत कथा

हिंदू धर्माच्या प्रसारासाठी परदेशात भागवत कथा

Next
ठळक मुद्देसावरकरांच्या मायभूमीत शिकलोदेशसेवा करण्याची इच्छा होतीहिंदू धर्मिय नागरिकांना समाज प्रबोधनाच्या उद्देशाने ६ जिल्ह्यांत १२ दिवसीय कथेचे आयोजन

चंद्रकांत सोनार ।
धुळे : अखंड भारतातील मुळ हिंदू समाज पाकिस्तान येथील सिंध क्षेत्रात वास्तव्याला आहे़ त्यांची संख्या दोन टक्यापेक्षा अधिक आहे़ तेथील सनातन हिंदू धर्मांचे ३१० वर्षापुर्वीचे जुन्या धर्मपीठाचे ९ वे विराजमान संत यूधिष्ठिरलालजी यांच्या मार्गदर्शनाने सिंध क्षेत्रातील हिंदू धर्मिय नागरिकांना समाज प्रबोधनाच्या उद्देशाने ६ जिल्ह्यांत १२ दिवसीय कथेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भागवताचार्य राजीवकृष्णजी झा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
प्रश्न : धर्म कार्यासोबतच सामाजिक कार्यात आपण कसे योगदान देतात?
उत्तर: दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे स्व:ताच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देश्याने उदयपुर येथील नारायण सेवा संस्थेतर्फे सात लाख व श्रीरामजानकी सेवा समितीच्या माध्यमाने पाच लाखांची मदत संस्थेला देण्यात आली आहे़ या मदतीच्या माध्यमातुन गरीब-गरजु तसेच दिव्यांग १०१ व्यक्तीव शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ तसेच स्वयंरोजगारासाठी उदयपुर येथे मोबाइल रिपेरिंग, शिवण काम शिकविण्यात येत आहे़
प्रश्न : धर्मावरून समाजात होणारा तेढ दूर करण्यासाठी काय संदेश द्याल ?
उत्तर: तरूण सोशल मिडीयाच्या आहारी गेला आहे़ आपली एक पोस्ट दुसऱ्यात भांडण लावू शकते़ याची तरूणांनी भान ठेवावी़ आधुनिकतेकडे वाटचाल नक्की करा, मात्र आपला धर्म, संस्कृती व दुसºया धर्माविषयी आदर नक्की वाळगा, देश व समाज हित साध्य करुण भ्रष्टाचार विरहित भारत निर्माण करण्यात योगदान द्यावा़
प्रश्न : आपण किती भाषांमध्ये प्रवचनातून समाजप्रबोधन केले आहे ?
उत्तर: वृंदावन, काशी, नैमिषारण्य, बद्रीनाथ, मिथिलाधाम, चित्रकूट सारखे देशातील महत्वपूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये वृद्ध, गोरगरीबांमध्ये कथा श्रवनाचे कार्य केले आहे़ मराठी, आहीराणी, हिंदी, मारवाड़ी, गुजराती, भोजपुरी, मैथिली अशा १२ बोली भाषेत सातशे पेक्षाअधिक ठिकाणी देश-विदेशात भागवत, शिवकथा, रामकथा घेतल्या आहेत़ कथेच्या माध्यमातुन दिव्यांग, गोरगरीबांची रूग्णसेवा केली जाते़
सावरकरांच्या मायभूमीत शिकलो
नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मगावी बालाजी मंदिरात १३ वर्षाचा असतांना पहिल्यांदा रामकथा केली होती़ त्यावेळी संत मोरारीबापू, गोविंददेव गिरीजी यांचे मार्गदर्शन लाभले़ तर संस्कृत पठण अवधूत जोशी गुरूजीच्या याच्याकडे पूर्ण केले़
देशसेवा करण्याची इच्छा होती
बालवयापासुन स्वातंत्र्यवीर सावरकरांची पे्ररणा लाभल्याने सैन्यात भरर्ती होऊन राष्ट्रसेवेची इच्छा होती़ मात्र संधी न मिळाल्याने धर्मकार्यातुन समाज घडविण्याचे कार्य करीत आहे़ वनस्पतिशास्त्र विषयात बीएससी झाल्यानंतर जगदगुरू पद्मश्री नारायणदेवचार्यजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली़ महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड छत्तीसगढ़, कर्नाटक अशा राज्यात रामकथा, भागवतकथा, देवी भागवत, शिवकथा भजनसंध्या प्रवचन केले़

Web Title: Bhagwat stories abroad for the spread of Hinduism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.