नगाव येथे भूमिगत गटार कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 06:58 PM2020-09-10T18:58:33+5:302020-09-10T18:58:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : तालुक्यातील नगाव येथे ९ रोजी सकाळी ११ वाजता १४व्या वित्त आयोगामधून भूमीगत गटारींच्या कामाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील नगाव येथे ९ रोजी सकाळी ११ वाजता १४व्या वित्त आयोगामधून भूमीगत गटारींच्या कामाचे भूमिपूजन माजी सभापती, सरपंच ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांच्याहस्ते करण्यात आले.
नगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामे सुरु असून यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत भूमीगत गटारींचे दलित वस्तीत काम करण्यात आले आहे. तसेच गावातंर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्ता कॉक्रीटीकरण करणे, असे विविध कामे करण्यात आली आहेत. राहिलेली विकास कामे जि.प. सदस्य राम भदाणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नगाव गावासह संपुर्ण गटात करण्यात येतील. तसेच नगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विठ्ठल मंदीर परिसर, लाल चौक व महादेव मंदीर परिसरात १४ वा वित्तमधून भूमीगत गटारींचे काम होणार असल्याची माहिती सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांनी दिली.
याप्रसंगी डॉ.रामदास पाटील, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य राकेश भास्कर पाटील, कामीनी अशोक पाटील, रविंद्र देवचंद पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.