पर्यावरणासाठी देशभर सायकल भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:16 PM2019-01-01T22:16:34+5:302019-01-01T22:17:22+5:30

शिरपूर : उत्तराखंडमधील ५८ वर्षांचे भूपेंद्रसिंह मेहरा यांनी घेतला जनजागृतीचा वसा

Bicycle cruelty across the country for the environment | पर्यावरणासाठी देशभर सायकल भ्रमंती

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : सर्वसामान्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी या उद्देशाने उत्तराखंडमधील नैनीताल जवळील हल्द्वानी येथील ५८ वर्षाचे भूपेंद्रसिंह मेहरा चक्क सायकलवरून देशभर जनजागृती करीत आहेत़ सध्या ते मार्गस्थ होत असतांना शिरपूरला मुक्कामी आले होते, त्यानंतर ते गुजरातकडे रवाना झालेत़
प्लॉस्टिकमुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे़ उत्तराखंडामध्ये संपूर्णत: प्लॉस्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे़ महाराष्ट्र शासनानेही अगदी तशाच प्रकारे बंदी घालावी़ पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॉस्टिकरवर बंदी घालणे आवश्यक आहे, असेही मेहरा यांनी सांगितले़
दरम्यान, कुणीही प्लॉस्टिकचा वापर करू नये, झाडांची कत्तल थांबवावी, असा संदेश ते गावोगावी जावून देत आहेत़ स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे़
पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड मोहिम व स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती सायकलवरून करतांना वेगवेगळे अनुभव येत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना भेटून चर्चा होते, त्यांना या विषयाचे महत्व पटवून दिले जाते़ आतापर्यंत त्यांनी पाच लाख लोकांपर्यंत पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश पोहचविण्याचे समाधान लाभल्याचे सांगितले. सन २०१३ पासून सायकलवरून भारत भ्रमणाला सुरूवात केली़ पहिल्याच वर्षी १४३० किमीचा प्रवास सायकलवरून केला़ २०१५ मध्ये या मोहिमेबाबत मुख्यमंत्री देवेंद फडणवीास यांची भेट घेतली़ यंदा उत्तरप्रदेशात्तील १४ जिल्ह्यांतून सायकलवरून भ्रमंती केली़ त्यानंतर मध्यप्रदेश आणि आता महाराष्ट्ऱ महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांतून प्रवास करून ते शिरपूरला पोहचलेत़ एवढे सर्व केवळ पर्यावरण संरक्षण, संवर्धन संदेश लोकांपर्यंत पोहचून त्यांनी प्लॉस्टिकचा वापर करू नये यासाठीच ते काम करीत असल्याचे सांगण्यात आले़

Web Title: Bicycle cruelty across the country for the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे