बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, नरडाणा पोलिसात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Published: December 13, 2023 05:04 PM2023-12-13T17:04:41+5:302023-12-13T17:05:04+5:30
धुळे : भरधाव येणाऱ्या बसने दुचाकीला धडक दिल्याने, झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-आग्रा ...
धुळे : भरधाव येणाऱ्या बसने दुचाकीला धडक दिल्याने, झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील दभाषी गावाच्या फाट्याजवळ १० डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी नरडाणा पोलिस स्टेशनला १२ डिसेंबर रोजी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
भटू सुरेश देसले (वय २२, रा. विंचूर, ह.मु. नरडाणा) व पांडुरंग भास्कर पाटील (वय २९, रा. नरडाणा) हे दुचाकीने जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील दभाषी फाटयावर बसने (क्र. एमएच २०-बीएल ३४६८) दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात भटू देसले याच्या डोक्यास जोराचा मार लागला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर पांडुरंग पाटील हा जखमी झाला. याप्रकरणी चेतन साहेबराव कापडणे याने दिलेल्या फिर्यादीवरून नरडाणा पोलिस स्टेशनला बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज कुवर करीत आहेत.