महापालिकेत सफाई कामगारांची आता बायोमेट्रिक हजेरी!
By admin | Published: January 4, 2017 10:49 PM2017-01-04T22:49:48+5:302017-01-04T22:49:48+5:30
धुळे : मनपा स्वच्छता विभागातील कर्मचाºयांसह सफाई कामगारांना यापुढे बायोमेट्रिक पद्धतीने दैनंदिन हजेरी लावावी लागणार आहे़
धुळे : मनपा स्वच्छता विभागातील कर्मचाºयांसह सफाई कामगारांना यापुढे बायोमेट्रिक पद्धतीने दैनंदिन हजेरी लावावी लागणार आहे़ तसेच अधिकाºयांनादेखील बायोमेट्रिक मशीन्सवर हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे़ त्यामुळे कामचुकार कर्मचाºयांना चाप बसणार आहे़ हजेरीसाठी एकूण १३ मशीन्स कार्यान्वित करण्यात आले आहेत़
मनपाला स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छतेविषयक २ हजार गुणांसाठी १११ निकष पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे़ त्यात मुख्य कार्यालय पातळीवर कर्मचाºयांची हजेरी हादेखील भाग आहे़ मनपाच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगारांची संख्या ७०० आहे़ नवीन वर्षाच्या आरंभापासून या सर्व कामगारांची बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे़ त्यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकाकडेच एकूण ८ थम्ब मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ यापूर्वीही सन २०१२ मध्ये मनपा प्रशासनाने स्वच्छता कामगारांची बायोमेट्रिक हजेरी सुरू केली होती़ मात्र, यंत्रातच बिघाड झाल्याने बायोमेट्रिक हजेरी बंद होती़ त्यावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़सुभाष भामरे यांनी आक्षेप घेत चौकशीचे आदेशदेखील दिले होते़ मात्र याप्रकरणी कुणावरही कारवाई झाली नाही़ स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून आता पुन्हा बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे़ तसेच स्वच्छता हे शासनाचे अॅप आतापर्यंत ३३८ जणांनी डाऊनलोड केले आहे़ तसेच मनपाच्या घंटागाड्यांनादेखील जीपीएस यंत्रणा बसविल्याचे मनपा सूत्रांकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आले़