लॉकडाऊनमधे क्वारंटईन केलेल्या गरोदर मातेने दिला कन्येला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 01:19 PM2020-04-17T13:19:38+5:302020-04-17T13:20:25+5:30
पिंपळनेर येथील शिबीरात प्रशासनाकडून केली होती राहण्याची व्यवस्था
पिंपळनेर- लॉकडाऊनमधे गेल्या १८ दिवसांपासून क्वारंटईन असलेल्या एका गर्भवती महिलेने शुक्रवारी पहाटे एका कन्येला जन्म दिलेला आहे, परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ३० मार्चला सुरत येथून यवतमाळ पुसद येथे जाण्यासाठी १२ लोकांचे कुटुंब पिंपळनेर येथे १४ दिवसांसाठी क्वारंटईन करण्यात आले होते़
यात एक गर्भवती महिला होती, क्वारंटाईन मध्ये परिवाराला सदर महिन्याची चिंता होती़ तहसीलदार विनायक थविल यांनी सदर महिलेला हिम्मत देत कुठल्याही प्रकारे घाबरू नकोस तुझी सर्व काळजी प्रशासन घेईल यावरून सदर महिला निश्चिंत झाली, सदर महिलेची तपासणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राकेश मोहने करीत होते, सदर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील मोहाई हे कुटुंब असून त्यांची राहण्याची व्यवस्था येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात करण्यात आलेली आहे़ सदर महिलेला शुक्रवारी पहाटे त्रास होऊ लागल्याने त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ यावेळी सदर महिलेने पहाटे ५ वाजून ४५ मिटांनी एका कन्येला जन्म दिलेला आहे. त्यामुळे सोबत असलेले कुटूंबातील सदस्यांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील विश्व रुहानी मानव केंद्र यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांच्या माध्यमातून महिलेला पोषण आहार दिला जात आहे, मातेने कन्येला जन्म दिल्यानंतर संस्थेच्या माध्यमातून सदर महिलेला गोडशिरा दिला गेला, तहसीलदार विनायक थविल यांनी सदर जन्म देणारी माता, व मुलीची ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट दिली व वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाच्यावतीने तलाठी आर एस पवार सदर महिलेची काळजी घेतली जात आहे.