पिसाळलेल्या कुत्र्याचा एकाच दिवशी १२ जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 09:47 PM2019-12-29T21:47:31+5:302019-12-29T21:49:19+5:30

सोनगीर । चार बालकांचा समावेश, बंदोबस्त करण्याची मागणी

Bite the molten dog for 5 people in one day | पिसाळलेल्या कुत्र्याचा एकाच दिवशी १२ जणांना चावा

Dhule

Next

सोनगीर : धुळे तालुक्यातील सोनगीर गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी गेल्या दोन दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. शनिवारी दिवसभरात एका कुत्र्याने रस्त्यात येईल त्याला चावा घेतला. यात बारा जणांसह चार बालकांचा समावेश आहे. तसेच एक गायीवर देखील या कुत्र्याने हल्ला केला. यामुळे गावात अक्षरश: दहशतीचे वातावरण आहे.
सोनगीर येथे भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना हैराण केले आहे. त्यात शनिवारी पिसाळलेल्या कुत्र्याने १२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली. यामुळे सोनगीर गावातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांचे पालक हे भयभीत झाले आहेत.
गावातील धनगर गल्ली, मुख्य बाजारपेठ, मण्यार गल्ली, बागुल गल्ली, बालाजी नगरसह गावातील वेगवेगळ्या भागातील व परिसरात गेल्या दोन दिवसात सुमारे २० नागरीकांना पिसाळलेला कुत्र्यांनी चावा घेतला. यात फिरोजखा हसनखा मनियार, मुनाफ शेख बिस्मिल्ला, कांतीलाल धनगर, ऋषि सोनार, इस्माईल तेली, तुकाराम चौधरी, अनिज निकम, कुशल सोनगिरे, स्वाती बंजारा, प्रतीक ठाकरे, आराध्या जैन यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार व इंजेक्शनचा डोस देऊन पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तर अन्य सात ते आठ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याने त्यांनी सरळ धुळे गाठत उपचार करून घेतले. यामुळे अन्य नागरिकांची नावे समजू शकली नाहीत.

Web Title: Bite the molten dog for 5 people in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे