धुळे मनपाच्या प्रवेशव्दाराला भाजपने ठोकले ‘टाळे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:04 PM2018-03-07T16:04:23+5:302018-03-07T16:04:23+5:30
नागरी समस्या सोडविण्याची मागणी, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील नागरी समस्या त्वरीत सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पेठ विभाग मंडळातर्फे मनपा प्रवेशव्दाराला ‘टाळे’ ठोकण्यात आले़ अखेर मनपाच्या अधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारल्यानंतर दोन तासांनी आंदोलनाची सांगता झाली़
शहरातील मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करावा, पेठ भागात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे, सर्वत्र नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, महिलांसाठी सुलभ शौचालयांची निर्मिती करावी, पार्किंगची समस्या सोडविण्यात यावी, सरदार पटेल उद्यान सुरू करण्यात यावे, बंद सिग्नल सुरू करण्यात यावे, पाणी योजनेमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे, हागºया नाल्याला दोन्ही बाजूस कठडे बसविण्यात यावे, मौलवीगंज, गल्ली क्रमांक ७ मध्ये स्वच्छता करण्यात यावी यांसह विविध मागण्या या आंदोलनाव्दारे करण्यात आल्या़ भाजप पेठ विभाग मंडळाने यापूर्वी देखील मनपा प्रशासनाला निवेदन दिले होते़ मात्र समस्या न सुटल्याने बुधवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या प्रवेशव्दारास टाळे ठोकण्यात आले़ त्यानंतर प्रवेशव्दारासमोरच भाजप पदाधिकाºयांनी ठिय्या मांडला होता़ यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ अखेरीस मनपाचे कार्यालयीन अधीक्षक नारायण सोनार, चंद्रकांत उगले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्विकारले़ सुमारे दोन तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ या आंदोलनामुळे मनपासमोर वाहनांचा चांगलाच खोळंबा झाला होता़ या आंदोलनात जितेंद्र धात्रक, शिरीष शर्मा, तुषार भागवत, मुर्तजा अन्सारी, रईस हिंदूस्तानी, संजय तारगे, विजय सोनवणे, निनाद पाटील, अमोल भागवत, स्वप्निल लोकरे, सचिन कायस्थ सहभागी झाले होते़