शिरपूर तालुक्यात वाघडी गट व गणातून भाजपचे उमेदवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:32 AM2019-12-25T11:32:19+5:302019-12-25T11:32:37+5:30
पळासनेर गटातील उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांची मंगळवारी छाननी करण्यात आली. यात ५६ गटातून २१ तर ११२ गणातून ३० असे एकूण ५१ अर्ज बाद झाले आहे. छाननी अंती शिरपूर तालुक्यातील वाघाडी गट-गण बिनविरोध झाले आहेत. येथून भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. माघारीनंतर अधिकृत घोषणा होईल. तर सोमवारी माघारीनंतर पळासनेर गट देखील बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी अर्जांची छाननी झाली.छाननी अंती वाघाडी गटात राष्टÑवादीच्या उमेदवार सुशिलाबाई भील यांनी सादर केलेल्या घोषणा पत्रावर सह्या नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे एकमेव अर्ज शिल्लक असलेल्या भाजपच्या सकुबाई पारधी बिनविरोध झाल्यात़ वाघाडी गणात काँग्रेसच्या विमलाबाई सुपडू भील यांच्या घोषणा पत्र व नोटरीवर सह्या नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला़ त्यामुळे भाजपच्या रूपाबाई मन्साराम भील बिनविरोध झाल्यात़ त्या निमझरी ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत़