मुलभूत विकासासाठी भाजपा कटीबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:16 PM2018-12-16T17:16:48+5:302018-12-16T17:17:18+5:30

वाडी : विकासकामांचे उद्वघाटनप्रसंगी राहूल रंधे

BJP defers basic development | मुलभूत विकासासाठी भाजपा कटीबध्द

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : आपल्या वाडी गावात काँक्रिटीकरण, अमरधामचे काम झाले आहे. गावातील या मुख्य रस्त्यावर नेहमी अंधार असे. आता एलईडी लाईटमुळे रस्ता प्रकाशमान झाला आहे. दुभाजक व लाईटमुळे रस्त्याचे रुपच बदलले आहे. यामुळे रात्री अनेक स्री-पुरूष फिरताना दिसतात. आरोग्याच्या दृष्टीने हे चांगले आहे. श्रेय घेण्याचा आमचा उद्देश नव्हता तर काम झाले पाहिजे हाच उद्देश होता. कोणत्याही गोष्टीवरून राजकारण न करता गावाच्या विकासाचा विचार केला पाहिजे असे प्रतिपादन भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी केले़
वाडी बु येथे आदिवासी वस्तीमध्ये ठक्कर बाप्पा वस्तीसुधार योजनेअंतर्गत १२ लाख रूपये खर्चाच्या एलईडी लाईट व पोल तसेच ७ लाखाचा रस्ता काँक्रीटीकरण कामांचे उद्घाटन भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर तालुका भाजपाचे प्रभारी डॉ.जितेंद्र ठाकूर होते़
तालुका प्रभारी डॉ़जितेंद्र ठाकुर म्हणाले, सर्वसामान्य गरीबांच्या सेवेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. पण चांगल्या कामासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत, पण आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे उलट तुमचे गाव विकासापासुन वंचित राहील. शहराचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास नव्हे. आजही अनेक गावांमध्ये मुलभुत सुविधा नाहीत, त्या पुर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तालुक्यात नुकतेच २७१ वे आरोग्यविषयक शिबीर घेतले. आमचे आता अनुकरण करण्यापेक्षा आधी केले असते तर ही वेळ आली नसती. पण तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सुविधा, गॅस, वीज, पोहोचावी़ गरजुंना घरकुल, शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यावेळी माजी सरपंच दरबारसिंग राजपूत, माजी सरपंच विठ्ठल चौधरी, वासर्डीचे सरपंच मच्छीन्द्र भिल, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन  रवींद्र गुजर, विजय पाटील, निलेश महाजन, विजय देवरे, छगन पावरा, ओंकार बंजारा, नानेसिंग राजपूत, नंदलाल पाटील, दिलीप पाटील, ताहेर पटेल,  सुनील कोळी, सुभाष राजपूत, दशरथ भिल, आत्माराम भिल, गुरुदास गुजर, देवराम भामरे, सुरेश भिल, गणपत भिल, सुधाकर चौधरी, ज्ञानेश्वर गुजर, नवनीत पाटील,सावकार पाटील विजय मराठे, किरण मराठे, ललित मराठे, केवलसिंग राजपूत, राजेंद्र चौधरी, जयवंत चौधरी, शेखर माळी, शाम पाटील, अमोल गुजर, परमेश्वर कोळी,आदी गावातील व परिसरातील मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र पाटील, गणपत राजपूत,रणजित राजपूत, डीगंबर चौधरी यांनी केले तर  सूत्रसंचालन  प्रशांत पाटील यांनी केले.

Web Title: BJP defers basic development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे