भाजपाला पर्याय वैगरे नाही,आता फक्त कमळच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 07:21 PM2018-11-06T19:21:32+5:302018-11-06T19:22:38+5:30
अनिल गोटे : पत्रकाव्दारे मांडली स्पष्ट भुमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात ठिकठिकाणी ७८ सभा घेऊन वातावरण भाजपमय करण्यात आपल्यासह सहकाºयांनी योगदान दिले़ त्यामुळे झालेल्या दृश्य परिणामांचा विचार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही करावा लागत आहे़ त्यामुळे भाजपाला पर्याय वैगरे नाही, भाजप व कमळ चिन्हाशिवाय आता काहीही नाही, अशी स्पष्ट भूमिका आमदार अनिल गोटे यांनी निवेदनातून मांडली आहे़
निवडणुकांपासून दूर राहणाºया प्राध्यापक, वकील, डॉक्टर अशा विचारवंत, प्रतिष्ठीतांना शहर विकासाच्या प्रक्रियेत सक्रीय करून घेतले आहे़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकालाही उमेदवारी द्यायची नाही व महापालिकेच्या निवडणूकीत आयात-निर्यात उमेदवारांना कमळाची निशाणी देऊन पक्ष कलंकीत करायचा नाही़ पक्षाला जे यश मिळवून द्यायचे आहे ते निर्मळ स्फटीकासारखे पारदर्शक मिळवून द्यायचे आहे़ वर्षानुवर्षे पक्षासाठी पदरमोड करून कष्ट उपसणाºया कार्यकर्त्यांना खड्यासारखे बाजूला ठेऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात घेऊन पक्षवाढीची आलेली सूज भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने काडीइतक्या किंमतीची नाही़ सट्टेबाज, मटका, हातभट्टी, वाळूमाफिया, ठाण्यातील डंपर चोर ज्यांनी १५ वर्षे महापालिका लुटण्याचे कार्य केले त्यांना बरोबर घेऊन पालिका लुटण्याची संधी देणे हा मतदारांचा विश्वासघात ठरेल़ त्यामुळे अशा कारस्थानास मी पाठिंबा देऊ शकत नाही, असे आमदार गोटे यांनी म्हटले आहे़
तसेच ११ नोव्हेंबरला शिवतिर्थावरील सभेत आपण आपली भूमिका, भविष्यातील महापौर निश्चित करू़ पण भाजप व कमळ चिन्हाशिवाय आता काहीही नाही, असे पत्रक आमदार अनिल गोटे यांनी काढले आहे़