शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा, नगराध्यक्षपदी रजनी वानखेडे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:37 AM2017-12-14T11:37:31+5:302017-12-14T11:51:38+5:30

लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या रजनी वानखेडे ३ हजार २३३ मताधिक्याने विजयी

BJP flag on Shindkheda Nagar Panchayat | शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा, नगराध्यक्षपदी रजनी वानखेडे विजयी

शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा, नगराध्यक्षपदी रजनी वानखेडे विजयी

googlenewsNext
ठळक मुद्दे१७ जागांसाठी झाली निवडणूकअवघ्या ४० मिनीटात निकाल जाहीरविजयी उमेदवारांच्या समर्थकांनी केला जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : येथील नगरपंचायतीच्या  लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या रजनी वानखेडे या ३ हजार २३३ मताधिक्याने विजयी झाल्या. नगरसेवकपदाच्या १७ जागांपैकी १० जागाही काबीज केल्या.  तर  कॉँग्रेसला पाच व समाजवादी पक्षाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान शिवसेना व मनसेला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.
शिंदखेडा नगरपंचायतीसाठी बुधवारी ७२ टक्के मतदान झाले. गुरूवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली. यात लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या रजनी वानखेडे विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या मालती देशमुख यांचा ३ हजार २३३ मताधिक्याने  पराभव केला. तसेच नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने १० जागा मिळविल्या. कॉँग्रेसला पाच, व समाजवादी पक्षाला दोन जागा मिळाल्या. 
अवघ्या ४० मिनिटात निकाल
सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. त्यात तीन फेºया अखेर अवघ्या ४० मिनीटात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होवून निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. 


 

Web Title: BJP flag on Shindkheda Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.