भाजपने मनपा निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीला स्थान दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:38 PM2018-11-17T22:38:18+5:302018-11-17T22:42:34+5:30
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार : ओबीसी अल्पसंख्यांक मेळाव्यात आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे - एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाºयांवर प्राणघातक हल्ला करणाºया गुन्हेगाराला भारतीय जनता पार्टीने पक्ष प्रवेश देऊन निवडणूकीत गुन्हेगारी प्रवृत्तीला स्थान दिले आहे़ त्यामुळे पोलीस अधिकाºयांनी आता विचार करावा की, भाजपाच्या नेत्यांना पोलीस संरक्षण कसे द्यावे? असा सवाल मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला़
शहरातील चाळीसगाव रोडवरील आएशा मस्जिद शेजारी मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवेशनिमित्त शेतकरी, अल्पसंख्यांक, आदिवासी, दलीत, ओबीसी मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी होते़ तर महापौर कल्पना महाले, आमदार दीपिका चव्हाण, आमदार डॉ.सतिष पाटील, माजी आमदार संजय कांतीलाल चव्हाण, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदिप बेडसे, जि़प़सदस्य किरण गुलाबराव शिंदे, नगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नंदूरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, धुळे मनपा उपमहापौर उमेर अन्सारी, माजी स्थायी समिती सभापती विलास खोपडे, ज्योती पावरा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते़
घरपोच दारू हेच का नागरिकांसाठी अच्छे दिन ? - भाजपाने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळविली़ मात्र चार वर्षातही मराठा, धनगर, मुस्लिम या समाजांना आरक्षण मिळालेच नाही़ राष्ट्रवादी-काँग्रेसच्या काळातील योजनांमध्ये बदल करून नव्याने त्याच योजना सरकार जनतेपुढे आणत आहेत़ त्यातील बºयाच योजना फसव्या निघाल्या म्हणून बंद देखील पडल्या आहेत़ राष्ट्रवादी- काँग्रेसच्या काळात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता़ मात्र भाजप सरकारने तर दारू पिणाºयांची गैरसोय होऊ नये यासाठी घरपोच दारू देण्याचा निर्णय घेतला आहे़ यासाठी आता दारूची दुकाने सात वाजेला उघडण्याचा आदेश काढले आहे़ त्यामुळे आता सकाळी चहा नाही तर दारू पिण्याची वेळ भाजपाच्या काळात आली आहे़ जळगावचे मंत्री गिरीष महाजन यांनी तर दारूला महाराजा नाव दिल्यामुळे विक्री होत नसेल तर दारूला बाईचे नाव द्या मग बघा, दारू कशी विकली जाते, असे वक्तव्य केले़ एमआयएम हा भाजपाला मदत करणारा पक्ष आहे़ म्हणून जनतेने भूलथापांना बळी पडू नये़ महानगर पालिकेच्या निधी अभावी बंद पडलेल्या योजनांसाठी आम्ही येणाºया काळात संघर्ष करून मनपाला निधी पुरविण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देणार- पवार
केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे़ मात्र सत्तेवर येण्याआधी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते़ मात्र चार वर्षात सरकारकडून मुस्लिम समाजाला आरक्षण देता आले नाही़ राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्तेवर असतांना मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता़ मात्र या सरकारने आरक्षणास विरोध केल्यामुळे मुस्लिम समाजावर अन्याय झाला आहे़ लोकसभा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता केंद्रात आणि राज्यात आल्यास आरक्षणापासून वंचित मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले़
जळगावचे पार्सल आम्हाला शिकविणार
केंद्र सरकारने जनतेला मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या मंजूरीचे आश्वासन दिले आहे़ मात्र ४७ कोटीच्या तरतुदीत काय खरेच रेल्वे धुळ्यापर्यत येणार आहे का ? फक्त जनतेला खोटे स्वप्न दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे़ भाजपाला सत्तेवर येण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या मंत्र्यांकडे जबाबदारी दिली आहे़ मात्र धुळेकर जनता ‘जळगावचे पार्सल’ परत पाठविल्याशिवाय राहणार नाही, असे कदमबांडे यांनी सांगितले़
उच्चशिक्षित मुस्लिम युवा नेता राष्ट्रवादीत
पुणे येथील इर्शाद जहागिरदार यांनी भारतासह परदेशातील विविध विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे़ त्यांना समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी युवक कॉग्रेस पक्षापासून राजकीय वाटचाल केल्यानंतर राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे़
धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बळावर मनपावर सत्ता
राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहे़त म्हणूनच मनपावर १५ वर्ष राष्ट्रवादी-काँग्रेसकडे सत्ता दिली आहे़ मनपा भव्य इमारत, रस्ते, गटारी, आरोग्य सुविधा असा मुलभूत सुविधा देण्यास आमचे सरकार सक्षम असून पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचे महापौर महाले यांनी सांगितले़