भाजप लोकप्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:04 PM2020-04-20T22:04:21+5:302020-04-20T22:04:46+5:30
लॉकडाउन : विविध समस्या सोडविण्याची केली मागणी
धुळे : लॉकडाउनमुळे जिल्ह्यात विविध घटकांना निर्माण झालेल्या समस्यांसंदर्भात भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली़
माजी मंत्री आ. जयकुमार रावल, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री अमरिषभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आ. काशिराम पावरा, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हा परीषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, अनुप अग्रवाल, कामराज निकम, जि. प. चे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाºयांसोबत बैठक घेवून विविध समस्या मांडल्या़ निवेदन देवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावरील पावसाळयापूर्वी आवश्यक असणारी कामे सुरू करणे, गरीबांना धान्य वाटप करतांना त्यांना पावती देणे, केसरी कार्ड धारकांना देखील रेशन देणे, जिल्हयातील अनेक विद्यार्थी राज्याबाहेर, जिल्हा बाहेर अडकले आहेत त्यांना परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपायोजना करणे, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा लोकांना धान्य देणे, रोहयो मजूरांच्या खात्यावर तातडीने पैसे जमा करणे, अक्कलपाडा, बुराई, अमरावती प्रकल्पातून पाणी सोडणे अशा विविध विषयांवर जिल्हाधिकारी यादव यांच्याशी चर्चा केली़ त्यावर जिल्हाधिकारी यांनी देखील सकारात्मक भूमिका घेत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले़