चिमठाणे, मेथी गटावर भाजपचे वर्चस्व कायम
By अतुल.रत्नाकर.जोशी | Published: December 18, 2023 02:37 PM2023-12-18T14:37:39+5:302023-12-18T14:38:23+5:30
सोमवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली आणि अवघ्या अर्ध्यातासात दोन्ही गटाचा निकाल जाहीर झाला.
धुळे :जिल्हा परिषदेच्या चिमठाणे आणि मेथी गटात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने वर्चस्व कायम राखले आहे. चिमठाणे गटातून महेंद्र सुरतसिंग गिरासे (६६७४), तर मेथी गटातून प्रभाकर रघुनाथ पाटील (५५३२) हे विजयी झाले आहेत. चिमठाणे गटाच्या सदस्याला अपात्र ठरविल्याने, तर मेथी गटातील सदस्याने राजीनामा दिल्याने या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
चिमठाणे गटात दुहेरी तर मेथी गटात तिहेरी लढत झाली. दोन्ही गटासाठी रविवारी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ५३.४४ एवढी होती.
सोमवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. अवघ्या अर्ध्यातासात दोन्ही गटाचा निकाल जाहीर झाला. चिमठाणे गटातून भाजपचे महेंद्र गिरासे, तर मेथी गटातून प्रभाकर पाटील विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
दरम्यान मेथी गटात काँग्रेस तिसऱ्या स्थानी राहिली. विजयानंतर भाजपच्या समर्थकांनी जल्लोष केला.