शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लावणार घरावर काळे झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:47+5:302021-05-26T04:35:47+5:30
दिल्लीत शेतकरी व कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्यास सहा महिन्यांचा कालावधी होत आहे. त्यानंतरही केंद्र सरकार शेतकरी व कामगार ...
दिल्लीत शेतकरी व कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्यास सहा महिन्यांचा कालावधी होत आहे. त्यानंतरही केंद्र सरकार शेतकरी व कामगार विरोधी कायदे मागे घेण्यास तयार नाही. आता खतांच्या किमती वाढवून कॉर्पाेरेट कंपन्यांना १४ हजार कोटींचे अनुदान दिले आहे. खतांच्या किमती पूर्ववत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा बनाव केला जात आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी २६ मे रोजी घरांवर काळे झेंड लावण्याचा निर्णय किसान सभेच्या बैठकीत घेण्यात आला. कॉ. सुभाष लांडे अध्यक्षस्थानी होते. या वेळी कॉ.नामदेव गावंडे, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. बन्सी सातपुते, कॉ. हिरालाल परदेशी, कॉ. डॉ. महेश काेपुलवार, कॉ. नामदेव चव्हाण, कॉ.अशोक जाधव आदी उपस्थित होते. आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन किसान सभेतर्फे कॉ. हिरालाल परदेशी, कॉ. संतोष पाटील, कॉ. अर्जुन कोळी, काॅ. ॲड. मदन परदेशी, कॉ. गुमान पावरा, कॉ. ॲड. संतोष पाटील, कॉ. डॉ. किशोर सूर्यवंशी, कॉ. पोपटराव चौधरी, कॉ. वसंत पाटील, कॉ. हिरालाल सापे, काॅ. रमेश पारोळेकर, कॉ. अशोक बाविस्कर, कॉ. हुसेन बेग कादर, कॉ. बापू गर्दे, काॅ. कांतीलाल परदेशी आदींनी केले आहे.